मुंबई -बनावट लसीकरण प्रकरणीकांदिवलीच्या शिवम रुग्णालयाचे मालक असलेल्या जोडप्याला पोलीसांनी अटक केल्याची माहिती, मुंबईचे सह पोलीस आयुक्तांनी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट लसीकरण प्रकरणी हे दोघेच मुख्य आरोपी आहेत. याबाबत लवकरच मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत.
मुंबई महापालिकेद्वारे दिली लस
पहिल्या वेळेस काही लसी रुग्णालयाने राखून ठेवल्या होत्या. याच लसींचे डोस शिवम रुग्णालयाने आरोपींना दिले होते. याचा उपयोग नंतर हिरानंदानी सोसायटीमध्ये करण्यात आला. आातापर्यंत एकूण १० लोकांना अटक करण्यात आली आहे.