महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही', आरोग्य विभागाचा खुलासा - कोरोना रूग्णालयाची यादी

राज्यात कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा 'नसो फैरिंजीयल स्वाब' घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा आहेत, असा खुलासा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

Corona hospital
आरोग्य विभागाचा खुलासा

By

Published : Mar 18, 2020, 2:30 PM IST

Updated : Mar 18, 2020, 2:53 PM IST

मुंबई- कोरोना विषाणूची भीती आता संपूर्ण राज्यात पसरली आहे. याचा गैरफायदा घेत काही समाजविघातक कृत्य करणाऱ्यांनी राज्यातील रुग्णालयांची यादी प्रसिद्ध केली आहे. या खोट्या मेसेजमधून कोरोना रक्त तपासणी राज्यातील या रुग्णालयात केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागाने तत्काळ खुलासा केला आहे.

राज्यात कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा 'नसो फैरिंजीयल स्वॅब' घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यासह 4 ते 5 ठिकाणी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 18, 2020, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details