महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरस: सुट्टी जाहीर नाही... 'ते' परिपत्रक खोटे! - कोरोना फेक न्यूुज

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत.

fake-circular-about-corona
fake-circular-about-corona

By

Published : Mar 13, 2020, 8:39 PM IST

Updated : Mar 13, 2020, 9:29 PM IST

मुंबई- भारतातील कोरोनाची लागण पाहता महाराष्ट्रासह काही राज्यांत केंद्र सरकाने सुट्टी जाहीर केली असल्याचे एक पत्रक सध्या व्हायरल होत आहे. त्यातून अत्यंत बोगस आणि चुकीची अफवा पसरवली जात आहे. तसेच हे पत्रक खोटे असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 13, 2020, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details