महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चुना - गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूना

राजस्थान येथील आरिफ शेख याने स्वतःला लष्करातील अधिकारी सांगून चारचाकी गाडी सहा लाख रुपयांना तत्काळ विकायची आहे, अशी बनावट जाहिरात ऑनलाईन दिली होती.

fake-advertisement-for-selling-a-car-6-lacks-fraud-mumbai
गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूनागाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूना

By

Published : Dec 17, 2019, 7:31 PM IST

मुंबई- येथील माटुंगा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला ऑनलाईन गाडीची बनावट जाहिरात देऊन सहा लाखांचा गंडा घातला आहे. सेलूकुमार सेविअर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माटुंगा पोलीस ठाण्याच्या सायबर सेल पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.

गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूना

हेही वाचा-प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी तरुणीला १० वर्षांची शिक्षा

राजस्थान येथील आरिफ शेख याने स्वतःला लष्करातील अधिकारी सांगून चारचाकी गाडी सहा लाख रुपयांना तत्काळ विकायची आहे, अशी बनावट जाहिरात ऑनलाईन दिली होती. त्यानुसार तक्रारदार सेलूकुमार यांनी गाडी घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. या वेळी आरोपी आरिफ शेख याने आपण लष्करातील अधिकारी असून आपल्याला पेटीएमच्या माध्यमातून तत्काळ पैसे हवे असल्याचे सांगितले. त्यानुसार सेलूकुमार यांनी पैसे दिले. मात्र, सहा लाख रुपये देऊनही गाडी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details