महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fadnavis On State Position : महाराष्ट्र नंबर एकच राहणार, गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करणार - देवेंद्र फडणवीस - Fadnavis On Ganesh Festival

Fadnavis On State Position: गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर जी काही विघ्नं आहेत त्या सर्व विघ्नांना (Fadnavis On Ganesh Festival) दूर करण्याची शक्ती गणपती बाप्पांनी (Maharashtra remain number one) पंतप्रधान नरेंद्र मोदी व आम्हाला द्यावी, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. मला विश्वास आहे, याबाबतीत जो आशीर्वाद आम्हाला भेटणार आहे, (Ganesh Festival 2023) त्या कारणाने महाराष्ट्र हा नंबर एकच राहणार आहे. आम्ही 'ट्रिलियन डॉलर इकॉनोमी' तयार करू (Deputy CM Devendra Fadnavis) व गरीब शेतकरी मजूर वर्ग हे जे आपले घटक आहेत, त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आमचं सरकार नेहमीच कार्य करत राहील असंही फडणवीस म्हणाले. (Women Reservation Bill)

Fadnavis On State Position
देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 9:00 PM IST

गणेशोत्सव काळात राजकीय मत मांडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई Fadnavis On State Position:'नारीशक्ती वंदन अधिनियम' (Women Reservation Bill) हे विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतसुद्धा मंजूर झाल्याने आता याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या कारणाने सर्वत्र या विधेयकाचं स्वागत होत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ganesh Festival 2023) यांनी सुद्धा याबाबत (Maharashtra remain number one) आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या विधेयकामुळे अर्थकारणात महिलांचा सहभाग वाढणार असून त्याकारणाने देशातील अर्थ व्यवस्थेला चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबईत भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. (Deputy CM Devendra Fadnavis)



वर्षानुवर्षे फक्त चर्चा :याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'नारीशक्ती वंदन अधिनियम' हे विधेयक लोकसभा व राज्यसभा या दोघांनीही पारित केल्यामुळे आता त्याचं कायद्यात रुपांतर झालं आहे. मागील अनेक वर्षांपासून महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये आरक्षण देण्याबाबत फक्त चर्चा होत होती; परंतु मोदी सरकारने व स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रत्यक्षात खरं करून दाखवलं आहे. मी लोकसभेच्या व राज्यसभेच्या सर्व प्रतिनिधींचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो. मला विश्वास आहे की, इतिहासामध्ये जेव्हा या निर्णयाचं सिंहावलोकन होईल तेव्हा भारताच्या विकास यात्रेमध्ये अत्यंत महत्त्वाची घटना ही 'महिला आरक्षण विधेयक' ठरलेलं असेल. महिलांच्या सहभागामुळे लोकशाही समृद्ध होईल व आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेला सुद्धा मानव संसाधनाचं दुसरं चाक जोडण्यामध्ये याचा फार मोठा वाटा असणार आहे. म्हणून मी या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अर्थकारणातही महिलांचा सहभाग :विशेष म्हणजे लोकसभा व राज्यसभेमध्ये बहुमताने यावर निर्णय घेण्यात आला असल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, लोकसभेमध्ये फक्त दोन मते या विधेयकाच्या विरोधात गेली. परंतु, राज्यसभेमध्ये शंभर टक्के मतं या विधेयकाच्या बाजूने आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मला असं वाटतं की, इतिहासामध्ये जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा विकसित भारताच्या इतिहासात या विधेयकाचे फार मोठे योगदान असेल. महिला या फक्त राजकारणामध्ये व लोक तंत्रामध्ये सहभागी नसतील तर यापुढे जाऊन अर्थकारणातही महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. आपल्या मानवी संसाधनाची दोन्ही चाकं जेव्हा एकत्र चालतील तेव्हा मला विश्वास आहे की, विकसित भारत व्हायला जास्त वेळ लागणार नाही व आपणाला कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:

  1. Anil Parab On MLA Disqualification : विधान परिषदेचे ते तीन आमदारही अपात्र होणार - अनिल परब
  2. Vijay Vadettiwar On Mahayuti : राज्यात तीन टग्यांचं राज्य; आधी 1 अलीबाबा 40 चोर, आता 2 अलीबाबा 80 चोर
  3. Rohit Pawar Criticism BJP : भाजपाला लोकनेते आवडत नाहीत - रोहित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details