मुंबई : कर्नाटक मधील संघटना कन्नड रक्षण वेदिकेच्या हिंसक कारवाया वाढल्या असून हिरेबाग वाडी परिसरात गाड्या फोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाने (maharashtra karnataka border dispute) पुन्हा एकदा उग्ररूप धारण केले असून कर्नाटकातील ही संघटना आक्रमकपणे हिंसक कारवाया करत आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांच्याकडे दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन :दरम्यान,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.
राज्याच्या हद्दीत जाऊ दिले जाणार नाही : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात पाऊल ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर जिल्हा प्रशासन त्यांना प्रवेश रोखण्यात अपयशी ठरले तर आम्ही त्यांना रोखू. महाराष्ट्र एकीकरण समिती अ (एमईएस) आणि शिवसेना अनेक वर्षांपासून निवेदने देत आहेत. काहीही झाले तरी त्यांना राज्याच्या हद्दीत जाऊ दिले जाणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
दोषींंवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले : महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे कर्नाटकात कोणी स्वागत करत नाही. ते कन्नड आणि मराठी भाषिक लोकांमध्ये तेढ निर्माण करतील. ते दहशतवाद्यांसारखे वागत आहेत आणि कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्थेचे संकट निर्माण करत आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध करून आपली भूमिका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींंवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.