मुंबई -राज्यात ३ पक्षांचे सरकार चालूच शकत नाही. त्यामुळे राज्यात भाजप वगळता कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधीत केले.
राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार, फडणवीसांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास - राज्यात भाजपचंच सरकार येणार
राज्यात ३ पक्षांचे सरकार चालूच शकत नाही. त्यामुळे राज्यात भाजप वगळता कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती आहे.
राज्यात 3 पक्षांचे सरकार बनणार नाही. जर बनलेच तर ते 6 महिनेदेखील टिकणार नाही. त्यामुळे आपलेच सरकार येणार असा विश्वास आमदारांना संबोधीत करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा तुम्हाल मुंबईत बोलावण्यात येईल. मात्र, आता आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन काम करा आणि शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्या, असा सल्ला फडणवीस यांनी आमदारांना दिला. याचबरोबर बैठकीत प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले.