मुंबईFadnavis Appeal On Diwali:सर्व देशभर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा धोका हा सुद्धा चिंतेचा विषय झाला आहे. अशा प्रसंगी दिवाळी उत्साहात साजरी करा. फटाके फोडा, दिवे लावा, मुलांनाही फटाके फोडू द्या, परंतु प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलयं. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. (air pollution due to firecrackers)
भाजपा कडून "पालावरची दीपावली" उपक्रम:दिवाळीच्या निमित्तानं गोरगरीब, तळागाळातील सामान्य जनतेलासुद्धा ही दिवाळी साजरी करता आली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कडून "पालावरची दीपावली" हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज (रविवारी) दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील सर्वांत जुन्या कोळीवाड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते गरीब जनतेला दीपावली निमित्त साहित्यांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी देवेंद्र फडवणीसांनी भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना मी महालक्ष्मीच्या चरणी करतो, असं ते म्हणाले आहेत. तसेच दिवाळी ही समाजातील प्रत्येक घटकाला साजरी करता यावी म्हणूनच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाप्रमाणे गरीबातील गरीब घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. याच अनुषंगानं मुंबईतील कुलाबा येथील सर्वांत जुन्या कोळीवाड्यात आम्ही आज दीपावलीनिमित्त साहित्य वाटप करण्यासाठी आलो असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Fadnavis Appeal On Diwali: फटाके फोडा, दिवे लावा, पण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन - DCM Devendra Fadnavis Appeal to People
Fadnavis Appeal On Diwali: दिवाळीच्या शुभ पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali 2023) दिल्या आहेत. (air pollution in Mumbai) सोबतच वायू प्रदूषणाविषयी नागरिकांना सजग केलयं. फटाके फोडा, दिवे लावा, मुलांनाही फटाके फोडू द्या; परंतु प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलयं.
Published : Nov 12, 2023, 3:49 PM IST
|Updated : Nov 12, 2023, 4:07 PM IST
फटाक्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करा:याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबाबतसुद्धा चिंता व्यक्त केली. ते म्हणाले आहेत की, "माननीय उच्च न्यायालयाने फटाक्यांच्या संदर्भात जे काही निर्देश दिले आहेत त्याचे पालन सर्वांनी करायला पाहिजे. दिवाळी ही उत्साहात साजरी करायचीच आहे. परंतु त्याचवेळी पर्यावरणाचे नियमसुद्धा आपणाला पाळावे लागतील. कारण ज्या पद्धतीनं प्रदूषण वाढत आहे त्या कारणाने रोगराईसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फटाके फोडा, दिवे लावा, प्रकाश करा; परंतु याने प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कमी धुराचे व कमी आवाजाचे फटाके फोडा", असं आवाहनही देवेंद्र फडवणीसांनी केलं आहे.
हेही वाचा:
- PM Narendra Modi Visit Himachal : पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी; देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
- Diwali Muhurat Trading 2023 : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज सकाळी नव्हे संध्याकाळी उघडतो शेअर बाजार, जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंग
- Diwali 2023 wishes : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!