महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Face To Face : किराणा दुकानात दारू विक्रीचा निर्णय प्रलंबितच; मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती - Decision on liquor in grocery stores

Face To Face Shambhuraj Desai: राज्याच्या महसुलात उत्पादनात तिसऱ्या क्रमांकाचा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावध पवित्रा घेतला आहे उत्पादन शुल्क वाडीचे उद्दिष्ट असतानाही राज्यातील किराणा दुकानांमध्ये दारू विक्रीचा घेतलेला निर्णय अद्यापही प्रलंबितच ठेवला असल्याचं राज्याचे मंत्री शंभूराज देसाई Excise Minister Shambhuraj Desai यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.

Face To Face Shambhuraj Desai
Face To Face Shambhuraj Desai

By

Published : Nov 12, 2022, 4:38 PM IST

Updated : Nov 13, 2022, 6:42 AM IST

मुंबई:राज्याच्या महसुली उत्पादनामध्ये वाढ करायची असेल तर विविध मार्गांनी ती वाढ करावी लागते. यातील महत्त्वाचे उत्पादन हे दारूवरील करामधून म्हणजेच उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. हा तिसऱ्या क्रमांकाचा विभाग उत्पन्न देणारा आहे. दरवर्षी या उत्पन्नामध्ये वाढ होत असून 17000 कोटी रुपये पर्यंत महसुलाचे उत्पन्न गतवर्षीपर्यंत होते. यावर्षी हे उद्दिष्ट आणखी वाढले असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी ग्वाही उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई Excise Minister Shambhuraj Desai यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

बनावट मद्याला आळा:राज्यात बनावट मध्ये विक्री द्वारे मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला जातो. परराज्यातून चोरट्या मार्गाने आणल्या जाणाऱ्या बनावट मध्य विक्रीच्या मुळे राज्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असतो याबाबत गेल्या तीन महिन्यांमध्ये आम्ही प्रचंड कारवाया केल्या आहेत. शेजारच्या तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा आणि गुजरात या राज्यांमधून होणारी चोरटी आयात थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे कोट्यवधींची बनावट दारू आम्ही जप्त केलेली आहे. त्यामुळे यावर्षी मार्च अखेरपर्यंत आपल्या महसुलात निश्चितच वाढ झालेली असेल, कारण यापुढे सातत्याने आम्ही ही कारवाई सुरूच ठेवणार आहोत असा दावाही त्यांनी केला.

किराणा दुकानात दारू विक्रीचा निर्णय प्रलंबितच

अध्यायावत यंत्रणेसह खबऱ्यांचे जाळे विस्तारणार:अवैध मद्य विक्री आणि अनधिकृत विक्री यावर आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रणा वायरलेस यंत्रणा आणि सुसज्ज भरारी पथकांवर आम्ही जबाबदारी सोपवलेली आहे. भरारी पथकांना अधिक बळ देण्यात येणार असून कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी लागणारे खबऱ्यांचे जाळे विस्तारण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदही आम्ही करत आहोत. त्यामुळे आगामी काळात अवैध कारवाया थांबतील किंवा त्या पकडल्या जातील यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले जाईल असेही देसाई यांनी सांगितले.

किराणा दुकानात दारू नाही:मद्य विक्रीतून अधिकाधिक महसूल गोळा करण्यासाठी राज्याच्या किराणा दुकानांमध्ये आणि मॉलमध्ये दारू विक्रीला परवाना देण्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र तो निर्णय अद्यापही प्रलंबितच असून त्याच्या अंमलबजावणी बाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि तो निर्णय तसाच प्रलंबित आहे. त्याबाबत सरकार अद्याप कोणत्याही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे आगामी काळातही किराणा दुकानांमध्ये दारू उपलब्ध होणार नाही. असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे. व्यसनाधीनता वाढू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र त्याचबरोबर वैद्य मद्य विक्री मधून उत्पादन मिळवण्याचाही राज्य सरकारचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.

स्ट्रॉबेरीपासून वाईन तयार करण्याला प्रोत्साहन:महाराष्ट्रामध्ये अनेक वायनरीज आहेत. या वायनरींना प्रोत्साहन देऊन अधिकाधिक वायूचे उत्पादन कसे होईल. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांनी पिकवलेला द्राक्ष संत्रा यासारखा शेतमाल थेट वायनरीज मध्ये कसा पोहोचेल. दलालांचा अडथळा कसा राहणार नाही. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र स्ट्रॉबेरी पासून वाईन तयार करण्याचा प्रयत्न राज्यात झाला, याचां उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे तो चालू शकला नाही मात्र उत्पादन खर्च कमी करून स्ट्रॉबेरी पासूनही वाईन कशी उत्पादित करता येईल याकडे आम्ही लक्ष देत असून त्यासाठी आगामी काळात प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी सांगितलं.

केवळ अतिक्रमण हटवले:सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कबरी भोवती नव्याने अतिक्रमण तयार केले जात होते. या अतिक्रमणाला शिवप्रेमी संघटनांचा आणि नागरिकांचा विरोध होता. न्यायालयानेही यासंदर्भात अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. या सगळ्या बाबींचा विचार करून राज्य सरकारने केवळ अतिक्रमण हटवले आहे. अफजलखानाच्या कबरीच्या मूळ ढाच्याला आणि तिथल्या भिंतींना कसल्याही प्रकारचा धोका पोहोचवलेला नाही. त्यामुळे कुणीही याला जातीय अथवा राजकीय रंग देऊ नये असे, आवाहनही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने देसाई यांनी केले आहे.

Last Updated : Nov 13, 2022, 6:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details