महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

DRI Seized cocaine : दोन विदेशी महिलांकडून 18 कोटी रूपयांचे कोकेन जप्त, मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई - मुंबई विमानतळावर ड्रग्स कारवाई

महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई युनिटने विमानतळावर 18 कोटी रूपयांचे कोकेन जप्त केले आहे. मुंबई - आदिस अबाबाहून मुंबईला आलेल्या दोन प्रवाशांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळावर रोखण्यात आले. यावेळी ही कारवाई करण्यात आली.

DRI Seized cocaine
कोकेन जप्त

By

Published : Dec 3, 2022, 10:51 PM IST

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई युनिटने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने विमानतळावर 18 कोटी रूपयांचे कोकेन जप्त ( DRI Seized cocaine ) केले आहे. मुंबई - आदिस अबाबाहून मुंबईला आलेल्या दोन प्रवाशांना विमानतळावर रोखण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे 4 हॅण्डबॅगमध्ये कोकेन असलेले 8 प्लास्टिक पाऊच सापडले.

18 कोटींचे कोकेन जप्त - मुंबई डीआरआयने हे कोकेन जप्त केले जप्त केले असून, जप्त केलेल्या केलेल्या अंमली पदार्थांचे वजन 1,794 ग्रॅम आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 18 कोटी रुपये आहे, असे डीआरआय मुंबईने सांगितले.

दोन विदेशी महिलांकडून 18 कोटी रूपयांचे कोकेन जप्त
दोन विदेशी महिलांकडून 18 कोटी रूपयांचे कोकेन जप्त

दोन विदेशी महिलांना अटक -या प्रकरणात दोन विदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. महिलांनी पर्समध्ये पोकळी जागा बनवून त्यामध्ये हे अंमली पदार्थ लपवले होते. दोन्ही परदेशी महिला आदिस अबाबाहून मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details