मुंबई - डोंगरी येथील इमारत सुरुवातीला ताडपत्रीचे एक मजली गोडाउन होते. त्यानंतर हळू-हळू लोक राहायला लागले. त्यामुळे मजले चढवण्यात आले आणि आता त्या गोडाउनची इमारत झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शी पीर मोहम्मद यांनी सांगितले.
'ताडपत्रीच्या गोडाउनची इमारत झाली अन् आज कोसळली' - dongri mumbai
केसरबाई इमारतीची जागा खोजा ट्रस्टच्या मालकीची आहे. त्यामुळे ही इमारत खोजा खासगी ट्रस्टची असल्याचे सांगितले जाते. गेल्या ४०-४५ वर्षांपासून लोक या परिसरात राहत असल्याचे पीर यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शी
डोंगरी येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास केसरबाई इमारत कोसळली. त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी आहेत. तसेच ४० ते ५० जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेणे सुरू आहे. ही इमारत म्हाडा आणि पालिका यांच्या अखत्यारीत येत नाही. या इमारतीची जागा खोजा ट्रस्टच्या मालकीची आहे. त्यामुळे ही इमारत खोजा खासगी ट्रस्टची असल्याचे सांगितले जाते. गेल्या ४०-४५ वर्षांपासून लोक या परिसरात राहत असल्याचे पीर यांनी सांगितले.
Last Updated : Jul 16, 2019, 8:54 PM IST