मुंबई : शहरातगुन्हेगारीचा आलेख वाढला आहे.तक्रारदार यांनी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यास तक्रार दिली की, 2 जूनला रात्री 12.30 वाजताच्या सुमारास दहीसर पश्चिम परीसरातील गंगा कुंची कुर्वे नावाचा गुंड प्रवृत्तीच्या ईसमाने तक्रारदार हे मॅनेजर म्हणुन काम करत असलेल्या जॉय अँड जॉय हॉटेलमध्ये त्याच्या दोन साथीदारांसोबत प्रवेश करुन सोबत आणलेल्या चाकूचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी व फुकट दारुची मागणी केली. त्यास तक्रारदार यांनी नकार दिला म्हणून, यातील आरोपी यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात हॉटेलच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपी गंगा कुंची कुर्वे याला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे.
गंभीर गुन्हे दाखल :या हकीकतीवरुन यातील आरोपी विरुद्ध एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 387, 506 (2), 504, 34 सह कलम 37(1)/135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी गंगा कुंची कुर्वे याचा पूर्व गुन्हेगारी इतिहास पाहिला असता आरोपीवर यापुर्वी 2009 मध्ये भारतीय दंड संविधान क- 324, 506(2), 504, 34, 2011 मध्ये भारतीय दंड संविधान कलम 324, 323, 504, 506 (2) व भारतीय दंड संविधान कलम 324, 504, 34 आणि भारतीय दंड संविधान कलम 326, 504, 34 तसेच 2012 मध्ये भारतीय दंड संविधान कलम 342, 452, 506 (2), 34 आणि भारतीय दंड संविधान कलम 302, 141, 143, 147, 149 व भारतीय दंड संविधान कलम 323,427,506 (2), 504,34 इतके गुन्हे दाखल आहेत.