महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 28, 2022, 1:40 PM IST

ETV Bharat / state

Mumbai terrorist attack : 26/11 दहशतवादी हल्ला कधीच विसरता येणार नाही : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

26/11 दहशतवादी हल्ला (26 11 Mumbai terror attack) कधी विसरता येणार नाही, असे म्हणत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली (S Jaishankar paid tribute to victims of 26 11) वाहिली.

Mumbai terrorist attack
26/11 दहशतवादी हल्ला

मुंबई : 26/11दहशतवादी हल्ला (26 11 Mumbai terror attack) कधी विसरता येणार नाही, असे म्हणत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली (S Jaishankar paid tribute to victims of 26 11) वाहिली.

दहशतवाद गंभीर धोका :आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी दहशतवाद हा खरोखरच गंभीर धोका आहे. तसेच संपूर्ण मानवजातीसाठी देखील आहे.आज आम्ही पीडितांच्या भावना ऐकल्या आहेत. त्यांचे नुकसान अपरिमित आहे असे पुढे जयशंकर म्हणाले. हॉटेल ताजमहाल पॅलेस, मुंबई येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये डॉ. एस जयशंकर (External Affairs Minister Dr S Jaishankar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दहशतवादविरोधी बैठक :भारत शुक्रवारपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची दोन दिवसीय दहशतवादविरोधी बैठक आयोजित करण्यात आली आहे. नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर रोजी मुंबई आणि नवी दिल्ली येथे दहशतवादविरोधी समितीची बैठक घेण्यात येत (Mumbai terrorist attack) आहे.

देशांमधील महत्त्वपूर्ण संबंधांवर विचार विनिमय :युनायटेड नेशन्समधील यूएस मिशनने बुधवारी एका मीडिया नोटमध्ये म्हटले आहे की - राजदूत लू दहशतवादविरोधी कारवाई आणि दोन्ही देशांमधील महत्त्वपूर्ण संबंधांवर विचार विनिमय करतील. परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांनी सांगितले की - ही दोन दिवसीय दहशतवाद विरोधी परिषद युएनएससी-सीटीसीद्वारे भारतात आयोजित केली जात आहे, जी 28 ऑक्टोबरपासून मुंबईपासून सुरू होणार (victims of 26 11 Mumbai terrorist attack) आहे

ABOUT THE AUTHOR

...view details