मुंबई- अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव अकरावीत प्रवेश घेता आला नाही त्यांनाप्रवेशासाठी शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा; अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या ६ विभागांतील अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतपर्यंत नियमित फेऱ्या आणि एफसीएफएस फेऱ्यात आयोजन करण्यात आलेले होते. या फेरीअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती. मात्र, ही मुदत वाढवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब-
कोरोनामुळे अकरावीचा २०२०-२१ वर्षातील प्रवेश प्रक्रिया जुलै २०२० पासून सुरू झाली. विलंबामुळे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले. तसेच विशेष फेरीस होणारा विलंब आणि प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे एफसीएफएस फेरीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या आणि एक प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात आली आहे. तर प्रवेशांपासून वंचित विद्यार्थ्यांसाठी दुसरी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात येत आहे.
अकरावीच्या प्रवेशाची शेवटची संधी-
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या ६ विभागांतील अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतपर्यंत नियमित फेऱ्या आणि एफसीएफएस फेऱ्यात आयोजन करण्यात आलेले होते. या फेरीअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती. मात्र, ही मुदत वाढवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठीची ही शेवटची संधी असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट सांगितले.
अर्ज करण्याची वेळ-
एफसीएफएस फेरीमध्ये अर्ज करणे व अलॉटमेंट घेण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपला प्रवेश विद्यालयात निश्चित करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करायचा आहे त्यांनी याच कालावधी आपला प्रवेश रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.