मुंबई- येथील म्हाडातर्फे गिरणीकामगारासाठी बांधण्यात आलेल्या पनवेल मधील कोन येथील २४१७ सदनिकांच्या सोडतीतील ३४६ यशस्वी गिरणी कामगार/वारसांना प्रथम सूचना पत्राच्या अनुषंगाने पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.
२ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांकरिता या भागातील घरासाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. २४१७ सदनिकापैकी ३४६ यशस्वी अर्जदारांनी अद्याप पात्रता निश्चिती करीता कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अर्जदारांना पात्रता निश्चितीकरिता ३१ ऑगस्ट, २०१९ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून त्यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या हॉलमार्क प्लाझा, कला नगर वांद्रे (पु) मुंबई ५१ या शाखेत बँकेच्या कार्यालयीन दिवशी व वेळेत कागदपत्र सादर करावीत. असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.