महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Air News : मुंबईत पुढील दोन दिवस हवेची गुणवत्ता आणखी ढासळणार, दक्षता घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

सध्या थंडीने मुंबई ( Dangerous air In Mumbai ) आणि पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे. मात्र मुंबई आणि पुण्यातील हवा आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील दोन दिवस मुंबईची हवा ( Air Pollution In Mumbai ) अतिधोकादायक असणार आहे. तर पुण्याची हवा धोकादायक ( Air Pollution Will Increase In Mumbai ) राहणार असल्याचा इशाराही ( Expert Advice Take Care Of Health ) देण्यात आला आहे.

By

Published : Jan 7, 2023, 6:38 PM IST

Dangerous air In Mumbai
मुंबई हवेची गुणवत्ता ढासळणार

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडी असली, तरी धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यातच थंडी वाढल्याने मुंबईसह ( Air Pollution In Mumbai ) पुण्याची हवाही खराब होऊ लागली आहे. वाढलेल्या प्रदुषणामुळे येत्या दोन दिवसात मुंबईतील हवा ( Air Pollution Will Increase In Mumbai ) अतिधोकादायक, तर पुण्याची हवा धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता सफर प्रणालीच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी ( Expert Advice Take Care Of Health ) घेण्याचे आवाहन तज्ज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे.

पुढील दोन दिवस ढासळणार हवेची गुणवत्तामुंबईकरांना पुढील दोन दिवस आपल्या आरोग्याची विशेषतः श्वसनाची काळजी अधिक घ्यावी लागणार आहे. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेअंतर्गत असलेल्या सफर प्रणालीकडून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि हवेच्या गुणवत्तेचा अंदाज दिला जातो. त्यानुसार, हवेच्या गुणवत्तेची चांगली, समाधानकारक, सामान्य, धोकादायक, अतिधोकादायक असे निष्कर्ष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबईची हवा ( Dangerous Air In Mumbai) धोकादायक पातळीवर राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई आणि पुण्याची बिघडली हवामुंबई आणि पुण्याची हवा बिघडल्याचे सध्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात थंडी ( Increased Cold At Mumbai ) वाढल्यामुळे या दोन्ही शहरातील प्रदूषणातही वाढ झाली आहे. प्रदूषणात काही धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईत धुक्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मुंबईची हवा ( Dangerous air In Mumbai ) अतिधोकादायक पातळीवर राहण्याचा अंदाज आहे.

कुठे असणार अतिधोकादायक हवामुंबईतील कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबूर, मालाड, नवी मुंबई, येथील हवेची गुणवत्ता अतिधोकादायक, तर भांडूप परिसरातील हवा धोकादायक पातळीवर असू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

काय घ्याल काळजीमुंबईतील हवेची खालावलेली गुणवत्ता ( Air Pollution Increased In Pune ) आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते. त्यात श्वास घेण्यात त्रास, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. विशेषत: अस्थमाच्या रुग्णांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक परिश्रमाची कामे करू नयेत, जास्त वेळ बाहेर राहणे टाळावे, सतत खोकला येऊ लागल्यास, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास त्वरित उपचार करावेत आणि औषधे घ्यावीत, असे डॉ विनायक तायडे यानी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details