मुंबई - गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या पुरातन मूर्तीचे दर्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी पर्वणी आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून २१ व्या शतकातील बापाच्या मूर्ती, चित्रे, आणि वस्तू प्रदर्शनात पाहायला मिळतील. २८ ऑगस्टला सुरू झालेले प्रदर्शन २ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
मुंबईत पुरातन गणेश मूर्ती, चित्रे व वस्तूंचे भरले प्रदर्शन हेही वाचा - गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात; रेखणीच्या कामांना वेग
प्रदर्शनातील बऱ्याच मूर्ती अतिदुर्मिळ आहेत, त्यामुळे या मूर्तीचे प्रदर्शन भरवून मुंबईकरांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत . सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्ती आणि चित्रे संग्रहक डॉक्टर प्रकाश कोठारी यांनी संग्रहित केल्या असून जनतेला या मूर्ती पाहता याव्यात तसेच लोकांना देशाचा पुरातन ठेवा पाहता यावा यासाठी हे प्रदर्शन आपण भरवले असल्याचे त्यांनी सांगीतले. सरूवातीपासूनच लोकांनी प्रदर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा - यंदा लालबागचा राजा अंतराळात; 'हे' दृश्य बघून तुम्हालाही वाटेल अभिमान