महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Medical Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय फंडातून सात महिन्यांत ३६०० रुग्णांना दिलासा; २८ कोटी​ची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यांत कक्षाकडून 3600 रुग्णांना एकूण 28 कोटी 32 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मूळ संकल्पक तथा कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

​​Chief Minister Medical Fund
​​Chief Minister Medical Fund

By

Published : Feb 5, 2023, 5:21 PM IST

मुंबई ​: आर्थिक, दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता केंद्र सुरू केले. पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख, डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख. जानेवारी 2023 मध्ये विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

अनेक रुग्णांना मदत उपलब्ध :जानेवारी महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.
​​

राज्यातील एकही सर्वसामान्य : गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा, रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.

हेही वाचा -Mangesh Kudalkar challenged Aaditya Thackeray : माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा; मंगेश कुडाळकर यांचे आदित्य ठाकरेंना आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details