मुंबईExam Fee Refunded:महाराष्ट्रात 2019 साली 13,521 पदांसाठी 34 जिल्ह्यात भरती प्रक्रिया घेण्यात आली. मात्र ही भरती प्रक्रिया रेंगळली. या भरतीच्या माध्यमातून परीक्षा शुल्कापोटी संबंधित विभागाकडे व ग्राम विकास विभागाकडे 33 कोटी रुपये जमा झाले आहेत. या भरती प्रक्रियेला चार वर्षे उलटून गेली तरी विद्यार्थ्यांना पैसे परत मिळालेले नाहीत. (Minister Girish Mahajan) काही विद्यार्थ्यांची वयो मर्यादा ओलांडून गेली आहे. त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्यांच्या खात्यात जमा करावे. नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा शुल्क न भरण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.
परीक्षा शुल्क परत करा- दानवे :विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक द्या. परीक्षा शुल्क लगेच परत करतो. या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विषयीची माहिती प्रसिद्ध देखील केली जात आहे. ऑनलाइन जरी परीक्षा शुल्क भरले असेल तरीदेखील संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची पडताळणी करून परीक्षा शुल्क परत केले जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.