मुंबई : पोलीस भरतीसाठी धावताना कोसळून माझी सैनिक सचिन कदम 42 यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याआधी देखील मैदानात दोघांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. 1600 मीटर धावताना गणेश उगले आणि अमर सोलंकी या दोन पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा मृत्यू झाला.
कल्याणमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले: मूळचे खेड तालुक्यातील दहिवली येथील रहिवासी असलेले सचिन कदम हे लष्करातून 2011 मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर टोरंटो इलेक्ट्रिकल पावरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. पोलीस भरतीसाठी कलिना येथील मुंबई विद्यापीठ मैदानात मैदानी चाचणीसाठी ते आले होते. 1600 मीटर धावण्यासाठी ते उतरले होते. मात्र तिसऱ्या फेरीत जमिनीवर कोसळले. त्यानंतर तात्काळ त्यांना बी एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांना घोषित करण्यात आले. तर सचिन कदम यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आणि आई असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर कल्याण येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.