मुंबई - भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.
माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण - निलेश राणे कोरोना बातमी
माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे.
![माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण nilesh rane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:44:04:1597587244-mh-mum-05-nilesh-rane-7205149-16082020194208-1608f-1597587128-1040.jpg)
nilesh rane
निलेश राणे यांनी स्वतः एक ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असे आवाहन राणे यांनी केले आहे.