मुंबई - लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज नेते सेना-भाजपामध्ये जात असतानाच आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमधून इनकमिंगला सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत हेही वाचा -'मोदी-शहा अखंड हिंदुस्थान निर्माण करतील, पण लोकांच्या चुली विझत गेल्या तर करायचं काय'
एकीकडे भाजप-शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवेश करुन घेत आहेत. असे असतानाच आज (शनिवारी) भाजपलाच राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी जोरदार धक्का देत एक माजी आमदार आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले आहे. भाजपमधून अनेक नाराज नेते, आमदारही राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश घेणार आहेत. आणि त्याला माझ्यापासून सुरुवात झाली असल्याचे घोटमारे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -'मला त्रास दिल्यावर काय परिणाम होतात दिसलंच असेल'
यावेळी माजी मंत्री रमेश बंब, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजू राऊत, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते.