महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MVA Mahamorcha: शिवरायांबद्दल वाटेल ते विधान कणाऱ्यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत; पवारांचा हल्लाबोल

Maha Vikas Aghadi Maha Morcha
महाविकास आघाडीचा महामोर्चा

By

Published : Dec 17, 2022, 7:04 AM IST

Updated : Dec 17, 2022, 2:22 PM IST

14:18 December 17

MVA Mahamorcha: शिवरायांबद्दल वाटेल ते विधान कणाऱ्यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत; पवारांचा हल्लाबोल

मुंबई - आज महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले होते. त्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे.राज्यपालांसहसरकारमधील मंत्री हे शिवरायांबद्दल वाटेल ते विधान करतात. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. लोकशाही मार्गाने त्यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असा दमही शरद पवार यांनी विरोधकांना भरला आहे.

13:36 December 17

MVA Mahamorcha: सरकार का थांबलय? राज्यपालांना हटवलेच पाहिजे; अजित दादांचा मोर्चात हल्लाबोल

मुंबई -सरकार का थांबलय? कोणता विचार करत आहे. महापुरुषांचा अपमान केला तरी कारवाई नाही. राज्यपालांना हटवलेच पाहिजे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा मोर्चात हल्लाबोल. तसेच, त्यांनी शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून महापुरुषांचे अपमान सुरू झाले असा घणाघातही त्यांनी केला आहे.

13:26 December 17

Mahamorcha Live: महाविकास आघाडीच्या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार दाखल

मुंबई - महाविकास आघाडीच्या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार दाखल झाले आहेत. दरम्यान, व्यासपिठावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह राजकीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

12:48 December 17

Mahamorcha Live: मुंबईत महामोर्चाला सुरूवात, उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरेही मोर्चात सहभागी

मुंबई - आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरूवात झाली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आदी नेते सहभागी झाले आहेत.

11:48 December 17

Mahamorcha Live: उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे मोर्चा स्थळाकडे रवाना

मुंबई - महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. त्याच्यासोबत माजी मंत्री आदित्य ठाकरेही मोर्चा स्थळाकडे रवाना झाले आहेत.

11:44 December 17

Mahamorcha Live: महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा सत्ताधारी नेत्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबई - महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा सत्ताधारी नेत्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपच्या आमदर तसेच, शिंदे गटातील आमदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

10:39 December 17

Mahamorcha Live: महामोर्चाला ठाण्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा

मुंबई -मुंबई येथे महामोर्चाला ठाण्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला आहे. येथील मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बसने मुंबईकडे रवाना झाले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोल नाका येथू मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

10:36 December 17

Mahamorcha Live: महापुरुषांच्या अपमानानंतरही देवेंद्र फडणवीस गप्पच; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई - हे महाराष्ट्र सरकार आंतरराज्य सीमा प्रश्नासह सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेच. पण, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचाही अपमान केला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून, देवेंद्र फडणवीस अशा विधानांसाठी माफी मागत नाहीत असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची केला आहे. त्या आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चात पत्रकारांशी बोलत होत्या.

09:31 December 17

Mahamorcha Live: महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई -आज मुंबत महाविकास आघाडीचा महामोर्चा आहे. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे जात आहेत. या मोर्चासाठी नाशिकवरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले आहेत. काही कारने तर काही कारने मुंबईकडे रवाना होत आहेत. राज्यात अस्थिरता असून त्याविषयी सरकारला धारेवर धरले जाईल असा ईशारा नेत्यांसह कार्यकर्ते देत आहेत. तसेच, यामध्ये हल्ला बोल, हल्ला बोल, महाराष्ट्र सरकारवर हल्ला बोल.. अशा घोषणा देत राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

09:08 December 17

Mahamorcha Live: एकच उद्दीष्ट अखंड महाराष्ट्र, मुंबई काँग्रेसचे महामोर्चात बॅनर

मुंबई - आज मुंबईत महाविकास आघआडीचा महामोर्चा सुरू झाला आहे. या मोर्चात विविध मुद्यांवर सराकरला घेरण्याचा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे. दरम्यान, आजच्या या मोर्चात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे पडसादही पाहायला मिळत आहेत. यामध्ये कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादानंतर 'एकच उद्दीष्ट अखंड महाराष्ट्र', असे मुंबई काँग्रेसने बॅनर लावले आहे. तसेच, मोर्चात असणाऱ्या वाहनांवरही बॅनर लावण्यात आले आहेत.

08:40 December 17

Mahamorcha Live: हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिल्यानंतर ठाण्यातील परिवहन सेवा आज बंद

मुबंई -शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिली आहे.आज सकाळपासून एकही बस रस्त्यावरून धावली नाही. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. परिवहन सेवा अचानक सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा आहे.

08:38 December 17

Mahamorcha Live: महामोर्चाला मुंबई पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबई - महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेल्या आजच्या महामोर्चाला मुंबईसह परिसरात अडीच हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोबाईल सर्व्हीस व्हँनच्या माध्यमातून मोर्चावर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, महामोर्चासाठी 350 पोलीस अधिकारी नियंत्रण करणार आहेत. दरम्यान, ठिकठिकाणी पोलीस वाहनंही लावण्यात आली आहेत.

07:24 December 17

Mahamorcha Love: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई - आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या सोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात होणार सहभागी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 200 गाड्यांचा ताफा मुंबईकडे भुजबळांसोबत निघाला आहे. यामध्ये कार्यकर्त्यांच्या हाता झेंडे फडकत असून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे.

07:21 December 17

Mahamorcha Live: महामोर्चासाठी महाविकास आघाडीकडून खास टीशर्ट्स

मुंबई - आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी महाविकास आघाडीकडून खास टीशर्ट्सची सोयकरण्यात आही आहे. 'महाविकास आघाडीचा महामोर्चा, हल्लाबोल असे' टीशर्टवर लिहिण्यात आले आहे.

07:15 December 17

MVA Mhamorcha Live: महामोर्चाला दोन लाख लोक येणार असल्याचा महाविकास आघाडीकडून दावा

मुंबई -महामोर्चाला दोन लाख लोक येतील असा अंदाज महाविकास आघाडीकडून वर्तवण्यात आला आहे. हा मोर्चा सकाळी 9 वाजता सुरु होणार असून भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनीत मोर्चेकरी जमा होणार आहेत. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. दरम्यान, तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्थेसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

06:35 December 17

Maha Vikas Aghadi Maha Morcha Live: महाविकास आघाडीचा महामोर्चा! वाचा, काय आहे अपडेट

मुंबई - महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ आज शनिवार (दि. १७ डिसेंबर) रोजी महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून निघणार असून त्याची सांगता आझाद मैदानात होणार आहे. दरम्यान, या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपे माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तर आज या मोठ्या घडामोडींसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या सर्व अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग त्यासह ताज्या बातम्यांचा आढावा आपल्या येथे वाचता येईल.

Last Updated : Dec 17, 2022, 2:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details