महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्न सोहळे पार पाडण्यासाठी नामी शक्कल, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने शोधला मार्ग - इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मुंबई

लग्नाचे मुख्य मुहूर्त मार्च, एप्रिल, मे या महिन्यात असतात. मात्र, कोरोनामुळे या महिन्यात विवाह होऊ शकले नाहीत. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने आता पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडता येणार आहे.

Marriage ceremony
विवाह समारंभ (संग्रहित)

By

Published : Jun 5, 2020, 10:45 PM IST

Updated : Jun 24, 2020, 3:52 PM IST

मुंबई - टाळेबंदीमुळे लग्न सोहळे रखडले आहेत. याचा फटका कॅटरिंग उद्योग, विवाह हॉल व्यवस्थापन यांना बसू लागला आहे. यावर उपाय म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली आहे.

विवाह समारंभ (संग्रहित)
लग्नाचे मुख्य मुहूर्त मार्च, एप्रिल, मे या महिन्यात असतात. मात्र, कोरोनामुळे या महिन्यात विवाह होऊ शकले नाहीत. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने आता पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडता येणार आहे.त्याआधीच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी तयारी करून ठेवली आहे. त्यानुसार 'कोरोना वेडिंग पॅकेज’ देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये वधू-वराच्या नातेवाईकांना मास्क आणि इतरांपेक्षा वेगळे दिसणारे वधू-वरासाठी स्पेशल डिझायनर मास्क, थर्मल स्क्रिनिंग, 50 जणांचे जेवण आदींचा पॅकेजमध्ये समावेश असणार आहे.साखरपुड्यापासून ते विवाह होण्यापर्यंत विशेष पॅकेज प्रत्येक वेळी तयार असते. त्यामध्ये रांगोळी, नववधू मेकअप, वधूची डोली, मेहंदी, फोटो, व्हिडीओ,स्टेज, हॉलची सजावट, केटरर्स, फुलांची प्री-वेडिंग शूट, गुरुजी आदी गोष्टींचा समावेश या पॅकेजमध्ये असतो. सध्या, कोरोनाची पार्श्वभूमी पाहता त्यामध्ये ई-डिझायनिंग लग्नपत्रिका, नातेवाईकांसाठी मास्क, थर्मल , युव्ही हॅण्ड सॅनिटायझर, स्टॅण्ड सॅनिटायझर यांचा पॅकेजमध्ये समावेश होऊ लागला आहे. वेबची ही जोड देण्यात येणार आहे. 50 जणांचे रेडिमेड जेवणही या पॅकेज मध्ये असणार आहे.कोरोना महामारीचे हे संकट कधी टळेल, हे सांगता येत नाही. आपल्याला कोरोना बरोबर जगायचे आहे, असे बोलले जात आहे. पूर्वीप्रमाणे लग्नसोहळे होतील की नाही, ते सांगता येत नाही म्हणून आम्ही आता पॅकेजमध्ये बदल करत आहोत, असे श्री इव्हेंटचे मनोज पाटील यांनी सांगितले. तसेच विशेष कोरोना पॅकेजवर फोकस करत त्याप्रकारे पेकेज तयार केले आहे. मास्क, 50 लोकांचे जेवण, विडिओ, फोटोग्राफी स्क्रिनिंग, अशी सुविधा आम्ही देणार आहोत. 35 हजार ते 1 लाखापर्यत हे पॅकेज असणार आहे. यामध्ये हॉलचा समावेश नाही. आलिंगन देणे किंवा हात न मिळवता शुभेच्छा देणारा, असा हा लग्नसोहळा पहिल्यादा होणार आहे, असही पाटील म्हणाले.
Last Updated : Jun 24, 2020, 3:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details