राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत "असे " दिले मोदींनी उत्तर
दिल्ली - नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत आहेत. यावेळी ते सरकारच्या आगामी पाच वर्षातील कामचे नियोजन मांडणार आहेत. अनुभवी खासदारांनी त्यांचा दृष्टीकोन मांडणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच सशक्त होण्याची संधी भारताने सोडता कामा नये, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर
पुढच्या लोकसभेला सुप्रिया सुळेंचा पराभव करणार - चंद्रकांत पाटील
पुणे - येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा तर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यासाठी दर १५ दिवसांनी बारामतीला जाणार आणि या लोकसभा मतदारसंघातील कमकुवत दुव्यावर काम करणार असल्याचेही पाटील म्हणाले. 'आपकी बार 220 पार' हाच नारा या विधानसभेला असल्याचे पाटील म्हणाले. वाचा सविस्तर
..तर माझे मामा जेलमध्ये असते का? अजित पवार यांचे प्रत्युत्तर
मुंबई - आणीबाणीत शिवसेनेने कॉंग्रेसला मदत केली, अजित पवारांच्या सरकारनचे माझ्या वडीलांना जेलमधे टाकले होते, असा आरोप आमदार बदामराव पंडित यांनी विधानसभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आणीबाणीत मी १६ वर्षाचा होतो आणि माझे मामा एनडी पाटील जेलमधे होते. आमचे सरकार असते तर माझे मामा जेलमध्ये असते का? असा सवाल करत विधानसभेत खसखस पिकवली. वाचा सविस्तर
मुंबईकरांसाठी खुशखबर.. आता प्रवास होणार 'बेस्ट', बेस्टच्या तिकीट दरात कपात
मुंबई - मुंबईतील बेस्ट च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्टच्या दर कपातीच्या प्रस्तावाचा निर्णय अखेर बहुमताने मंजूर करण्यात आला. यामुळे मुंबईकरांचा बस प्रवास आता अधिकच बेस्ट होणार आहे. वाचा सविस्तर
ज्ञानेश्वर माऊलींना सलामी देण्यासाठी मानाच्या २२ दिंड्या सज्ज
पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. इंद्रायणीकाठी वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. मंदिराच्या बाजूने मानाच्या २२ दिंड्यांची जुगलबंदी सुरू आहे. यामध्ये टाळ मृदुंगाच्या नादात वारकरी बेभान होऊन, नाचत आहेत.वाचा सविस्तर