RSA vs IND LIVE : चहलच्या फिरकीने आफ्रिकन फलंदाजांना नाचवले, ७ गडी माघारी
साऊथहॅम्प्टन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात द रोझ बाऊल क्रिकेट मैदानावर खेळण्यात येत असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघाचा या विश्वचषकातील हा पहिलाच सामना असणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील हा तिसरा सामना असून पहिल्या २ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालाय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ खेळल्या जात असलेल्या या सामन्यात विजय मिळवून पराभवाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरले. वाचा सविस्तर
मान्सून आला रे..! येत्या ७२ तासात केरळात होणार दाखल
पुणे - मान्सूनची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. येत्या ७२ तासांत केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे. साधारण ६ किंवा ७ जूनला मान्सून केरळात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सूनसाठी अरबी समुद्रातील वाऱ्याची अनुकूलता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ढगही जमा होऊ लागले आहेत. वाचा सविस्तर
'नीट'चा निकाल जाहीर, नाशिकचा सार्थक देशात सहावा
मुंबई - नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात नलिन खंडेलवाल देशात पहिला आला आहे. त्याने ७२० पैकी ७०१ गुण मिळवले आहेत. तर महाराष्ट्रातील सार्थक भट हा देशात सहाव्या स्थानी आहे. पहिल्या ५० टॉपरमध्ये राज्यातील तिघांचा समावेश आहे. तर मुलींमध्ये दिशा अग्रवाल राज्यात टॉपर आहे. वाचा सविस्तर
सरकारी काम अन्...मृत्यूनंतर तब्बल १७ वर्षांनी 'त्याच्या' सांगाड्यावर झाले अंत्यसंस्कार
पुणे - कोथरूड येथे खून झालेल्या एका १६ वर्षीय मुलाच्या सांगाड्यावर (हाडांचा सापळा) तब्बल १७ वर्षानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगड्यावर अंत्यसंस्कार करायला इतका विलंब झाल्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, उशिरा का होईना त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने त्याला मुक्ती मिळाल्याची भावना देखील काही जण व्यक्त करत आहे. निखिल रणपिसे, असे अंत्यविधी करण्यात आलेल्या अल्पवयीने मुलाचे नाव आहे. वाचा सविस्तर
संतापजनक..! स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधले शौचालय, लावल्या महात्मा गांधींचे चित्र असलेल्या टाईल्स
बुलंदशहर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या शौचालयाच्या आतील बाजूला चक्क महात्मा गांधींची प्रतिमा असलेल्या टाईल्स वापरण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील इच्छावरी गावात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. वाचा सविस्तर