आज... आत्ता... सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - kamal haasan
बुलडाण्यात काळा सोमवारः कंटेनर आणि प्रवासी टाटा मॅजिकचा भीषण अपघातात; १३ जण ठार. राज्यपालांची एसईबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी. 'पहिला दहशतवादी हिंदू' वक्तव्याप्रकरणी कमल हसन यांना अटकपूर्व जामीन. मालेगाव बॉम्बस्फोट; बचाव पक्षाच्या वकिलांना घटनास्थळी जाऊन करायचे आहे निरीक्षण, पोलीस सुरक्षेची मागणी. 'त्या' चुलती-पुतण्याच्या विवाहामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात; नागरिकांचा रास्ता रोको.
बुलडाण्यात काळा सोमवारः कंटेनर आणि प्रवासी टाटा मॅजिकचा भीषण अपघातात; १३ जण ठार
बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर येथे नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भरधाव कंटेनरचा टायर फुटल्याने, कंटेनरने एका प्रवासी टाटा मॅजिकवर जाऊन आदळला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वाचा सविस्तर...
राज्यपालांची एसईबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे. वाचा सविस्तर...
'पहिला दहशतवादी हिंदू' वक्तव्याप्रकरणी कमल हसन यांना अटकपूर्व जामीन
चेन्नई - मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, त्याचे नाव नथुराम गोडसे,' असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर 'प्रक्षोभक भाषण करुन जनतेमध्ये जातीय सलोखा बिघडवणारे वक्तव्य केल्याचा' गुन्हा दाखल झाला होता. वाचा सविस्तर...
मालेगाव बॉम्बस्फोट; बचाव पक्षाच्या वकिलांना घटनास्थळी जाऊन करायचे आहे निरीक्षण, पोलीस सुरक्षेची मागणी
मुंबई - 2008 मधील मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भातील सर्व मुख्य आरोपींच्या वकिलांनी एनआयए कोर्टात याचिका दाखल करत पोलीस सुरक्षा मागितली आहे. आरोपींच्या सर्व वकिलांना मालेगाव येथे झालेल्या बॉम्ब स्फोटासंदर्भात घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण करायचे असल्याने यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
'त्या' चुलती-पुतण्याच्या विवाहामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात; नागरिकांचा रास्ता रोको
हिंगोली - जिल्ह्यातील नहाद येथील ३७ वर्षीय चुलतीने १८ वर्षीय पुतण्यासोबत हट्टा येथील एका मंदिरात प्रेम विवाह केला होता. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चुलतीने पुतण्यासोबत प्रेमविवाह करून नात्याला काळीमा फासली. आता या दोघांचा ज्या मंदिरामध्ये विवाह पार पडला. त्यामुळे त्या मंदिराचे धार्मिक पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रेमीयुगुलावर पोलिसांनी कारवाई करावी, या मागणीसाठी आज हट्टा येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. रास्तारोको केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. वाचा सविस्तर...