महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - bulletin

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपावर टॅक्सीचालकही विश्वास ठेवणार नाहीत, असे वक्तव्य माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी केले. घड्याळाचे बटन दाबले तरी मत कमळालाच गेल्याचे स्वतः डोळ्यांनी पाहिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मोदींसारखा भित्रा पंतप्रधान आजपर्यंत बघितला नसल्याचे म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मान्सून १० जूनला महाराष्ट्रात येणार असल्याचा स्कायमेटने प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पुण्यात राजयोग साडी सेंटर या दुकानाला आग लागली. यात मृत्यू झालेल्या राकेश मेघवाल या तरुणाचे येत्या १७ तारखेला लग्न होते.

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर...

By

Published : May 9, 2019, 7:06 PM IST

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपावर टॅक्सीचालकही विश्वास ठेवणार नाहीत - माजी नौदल प्रमुख एल. रामदास
रायगड - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक पार्टीसाठी केला असल्याचा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील आरोपांचे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी खंडन केले आहे. अलिबाग तालुक्यातील भायमळा येथे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी आपल्या घरी पत्रकारांना माहिती दिली. वाचा सविस्तर..

घड्याळाचे बटन दाबले तरी मत कमळालाच, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय - शरद पवार
सातारा - सातारा ईव्हीएम मशीनमध्ये घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळते, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटते. त्यामुळे ही प्रक्रिया किचकट आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर..

मोदींसारखा भित्रा आणि कमजोर पंतप्रधान आजपर्यंत बघितला नाही, प्रियंका गांधींचा निशाणा
प्रतापगढ - नरेंद्र मोदींसारखा भित्रा आणि कमजोर पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले. जनतेला मोठे मानणे हीच राजकीय ताकद असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच हे पंतप्रधान जनतेच्या प्रश्नांची उत्तरेही देत नसल्याचे त्या म्हणाल्या. वाचा सविस्तर..

मान्सून येतोय ..! १ जूनला केरळात, तर १० जूनला महाराष्ट्रात? स्कायमेटचा प्राथमिक अंदाज
मुंबई - नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर शेतीसह अनेक क्षेत्रातील घडामोडींना वेग येतो. देशातील एकूण पर्जन्यमानापैकी ७० टक्के पाऊस याच काळात पडतो. मान्सूनचा शेती आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असल्याने संपूर्ण देश त्याच्या आगमानाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनचा प्राथमिक अंदाज जारी केला आहे. वाचा सविस्तर..

स्वतःचे लग्न असल्यामुळे 'तो' आज गावी जाणार होता, पण त्याआधीच मृत्यूने गाठले
पुणे - पुण्यात आज(गुरुवार) राजयोग साडी सेंटर या दुकानाला भीषण आग लागली होती. यात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यात मृत्यू झालेल्या राकेश मेघवाल (वय २०, मेवाड, राजस्थान ) या तरुणाचे येत्या १७ तारखेला लग्न होते. त्याकरीता तो आज गावी जाणार होता. त्याचे तिकीटही बुक झाले होते. पण, त्यापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाचा सविस्तर..

ABOUT THE AUTHOR

...view details