मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. भाजपकडून धनंजय मुंडे यांना टार्गेट करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी गुरुवारी धनंजय मुंडेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सर्व प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचा मंत्री जरी असला, तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुखांची प्रतिक्रिया काय आहे प्रकरण -
एका गायक तरुणीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल, तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो. याचा लोभ धरुन त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत.', अशी तक्रार या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात दिली होती. या आरोपांनतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - ..तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागितला पाहिजे- संजय राऊत