महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलीनीकरण झाले तरी राज्यात महायुतीचे सरकार - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलीनीकरणाचा युतीवर काहीही परिणाम होणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले

By

Published : Oct 9, 2019, 2:03 AM IST

मुंबई -शरद पवार यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले तरी याचा राज्यातील निवडणुकीवर कोणताही परिणाम दिसणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे विधान काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. याबाबत घाटकोपर येथे एका कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलीनीकरणाचा युतीवर काहीही परिणाम होणार नाही

हेही वाचा- 'मनसे' करणार का 'राज'कीय सीमोल्लंघन?


शरद पवार हे देशातील व राज्यातील मोठे नेते आहेत. सध्या राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार नाहीत. सोनिया गांधी यांच्याकडे असलेल्या पद हे तात्पुरते आहे. त्यामुळे काँग्रेसकडे खंबीर राष्ट्रीय अध्यक्षपद नसल्याने पक्ष दिसेनासा झाला आहे.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला, तरी येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार असे, रामदास आठवले म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details