मुंबई :राज्यातील विविध प्रश्न आणि प्रकल्पांसाठी मुंबईतील मंत्रालय (Mumbai Mantralaya) हा प्रशासकीय केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्यांसाठी मंत्रालय हे अतिशय महत्त्वाचे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपेक्षा पूर्ण करणारे कार्यालय वाटते. त्यादृष्टीने मंत्रालयात दररोज सर्वसामान्य नागरिकांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची (administrative officer) विविध बैठका आणि कामांसाठी गर्दी असते.
No Rush In Ministry : दिवाळीनंतरही मंत्रालयात शुकशुकाट - प्रशासकीय अधिकारी
दिवाळीनिमित्त (Even after Diwali ) गेले काही दिवस मंत्रालयातील कामकाज ठप्प (The work of the ministry is stopped) होते. दोन दिवस शासकीय सुट्टी होती. दिवाळी संपली तरी मात्र सध्या मंत्रालयात सध्या फारसे कामकाज झाले नाही, अजुनही मंत्रालयात सुट्टीचे वातावरण पहायला (there is no rush in the ministry) मिळत आहे.
![No Rush In Ministry : दिवाळीनंतरही मंत्रालयात शुकशुकाट Mantraly](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16767195-thumbnail-3x2-mum.jpg)
दुपारी दोन वाजल्यानंतर मंत्रालयातील सर्व मजले आणि दालने ही माणसांनी फुलून गेलेली दिसतात मात्र सध्या मंत्रालयात शुकशुकाट पहायला मिळत आहे. दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. मंत्रालयात गेल्या आठवड्याच्या शेवटी दिवाळीचे वेध लागले होते. गुरुवारपासूनच मंत्रालयात विविध भेटवस्तू फिरताना दिसत होत्या. शनिवारी रविवार सुट्टी असल्याने नागरिकांची गर्दी ही दिसत होती मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुट्टी असल्याने मंत्रालयाकडे कुणीही फिरकले नाही.
मंगळवारी कामाच्या दिवशीही अगदी तुरळक गर्दी दिसत होती. दिवाळीनंतर आज मंत्रालय कामकाज सुरू असतानाही मंत्रालयात कोणत्याही मजल्यावर कोणीही व्यक्ती कामानिमित्त आलेला दिसत नव्हता. इतकंच काय मंत्रालयातील अनेक दालणांमध्येही कर्मचारी उपस्थित नव्हते. मंत्री कार्यालयातही एकही मंत्री आज मंत्रालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे आज कामकाजाच्या दिवशीही दिवाळीचा मूड अद्याप ओसरला नसल्याने नागरिकांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही पाठ फिरवल्याचे दिसले.