मुंबई- राज्याची राजधानीची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा आजपासून पुन्हा रुळावर... दिल्लीत पेट्रोल डिझेलच्या दरात सलग नवव्या दिवशी पुन्हा वाढ... वंदे भारत मोहिमे अंतर्गत विदेशातील हजारो भारतीय मुंबईत दाखल.. यासारख्या महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर...
नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर इंधनाच्या दरात रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 76.26 रुपये प्रति लिटर तर डिझेल 74. 62 रुपये प्रति लिटर झाले आहे. गेल्या आठवड्यापासून इंधनदरात वाढ होत असून आज आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोलमध्ये 48 पैसे तर डिझेल दरात प्रति लिटर 59 पैशांनी वाढ झाली आहे.
वाचा सविस्तर - पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, वाचा किती रुपयांनी महागले
मुंबई - गेले अडीच महिने बंद असलेली मुंबईची 'लाईफलाईन', म्हणजेच लोकल आजपासून सुरू होत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच या गाड्या रुळावर धावणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार 15 जून पासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्याला रेल्वे बोर्डाने रविवारी रात्री उशीरा मंजुरी दिली.
वाचा सविस्तर - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून मुंबईची 'लाईफलाईन' रुळावर..
हैदराबाद :रविवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजेच, ११,९२९ कोरोना रुग्ण आढळून आले, त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३,२०,९२२वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पाहूया वेगवेगळ्या राज्यांमधील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...
वाचा सविस्तर - देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - वंदेभारत अभियानांतर्गत 72 विमानांमधून तब्बल 11 हजार 666 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4 हजार 313 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 3 हजार 729 इतकी आहे. तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 3 हजार 624 इतकी आहे.
वाचा सविस्तर - वंदेभारत अभियानांतर्गत 11 हजाराहून अधिक प्रवासी मुंबईत दाखल
मुंबई - राज्यात रविवारी कोरोनातून बरे झाल्यामुळे १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली इतकी आहे. राज्यात रविवारी एका दिवसात कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले. तर सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.