महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर... - sun

बुलडाण्यात मतांच्या आकडेवारीत गोलमाल, झालेले मतदान अन् मोजलेल्या मतदानात 583 मतांची तफावत, 2008 च्या दंगली प्रकरणी इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, मान्सून लांबणीवर : १२ जूनला कोकण किनापट्टीवर धडकणार; हवामान विभागाचा अंदाज, चंद्रपुरात सूर्य कोपला.. मंगळवारी चंद्रपूरचे तापमान जगामध्ये सर्वाधिक !, हैदराबाद विमानतळावर ११ किलो सोन्यासह १ कोटी ५० लाखांचे विदेशी चलन जप्त.

संपादित छायाचित्र

By

Published : May 28, 2019, 11:50 PM IST

बुलडाण्यात मतांच्या आकडेवारीत गोलमाल, झालेले मतदान अन् मोजलेल्या मतदानात 583 मतांची तफावत

बुलडाणा - बुलडाणा लोकसभा मतदारसंघात झालेली मतदान संख्या व मतदान मोजणी संख्या यामध्ये तफावत आढल्याचे समोर आले आहे. मोजलेल्या मतांमध्ये 583 मतांची तफावत असल्याने साशंकता निर्माण झाली असून अद्यापपर्यंत कुठल्याही उमेदवाराने यावर हरकत नोंदवलेली नाही.वाचा सविस्तर...

2008 च्या दंगली प्रकरणी इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

नाशिक - 2008 साली परप्रांतीया विरोधातील आंदोलनाच्या वेळेला इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये मनसैनिकांकडून दगडफेकीची घटना घडली होती. या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत इगतपुरीच्या न्यायालयात खटला सुरू होता. आजच्या सुनावणी दरम्यान इगतपुरी न्यायालयाने राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली.सविस्तर वाचा...

मान्सून लांबणीवर : १२ जूनला कोकण किनापट्टीवर धडकणार; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई- दुष्काळात होरपळलेला शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. परंतु, त्यांना चिंतेत टाकणारी बातमी हवामान खात्याकडून आली आहे. यंदा एक आठवडा उशिराने केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे. म्हणजे ६ जूननंतर मान्सून केरळात दाखल होईल, तर राज्यात साधारणत: १२ जूनला मान्सून कोकणच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागातील अधिकारी अरविंद श्रीवास्तव यांनी दिली.वाचा सविस्तर ...

चंद्रपुरात सूर्य कोपला.. मंगळवारी चंद्रपूरचे तापमान जगामध्ये सर्वाधिक !

चंद्रपूर -अंगाची लाही-लाही होणे काय असते, याचा प्रत्यय आज चंद्रपूरकरांना आला. शहराचे आजचे (मंगळवार) तापमान जगात सर्वाधिक म्हणजे ४७.८ डिग्री सेल्सिअस एवढे वाढले होते. जगामध्ये आज चंद्रपूर सर्वाधिक तापलेले शहर म्हणून गणले गेले. त्यापाठोपाठ पाकिस्तानमधील जाकोबाबाद व नागपूर महानगर तापले होते. या दोन्ही शहरांचे तापमान ४७.५ डिग्री सेल्सिअस होते.वाचा सविस्तर...

हैदराबाद विमानतळावर ११ किलो सोन्यासह १ कोटी ५० लाखांचे विदेशी चलन जप्त

हैदराबाद - येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधरित्या नेले जाणारे ११ किलो सोने आणि १ कोटी ५० लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. महसूल निर्देशालयाच्या (डीआयआर) अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details