महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर... - gondia murder

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक. भागवत यांच्यानंतर शिवसेनेने आळवला राम राग, म्हणाले- रामाचे काम होणारच. गोंदियात भरचौकात २२ वर्षांच्या तरुणाची हत्या, दगडाने ठेचले डोके. बारावी परीक्षेत नापास झाल्यामुळे एकुलत्या एक मुलाची आत्महत्या. नदी आटल्याने मोहाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई; ३ दिवसांनी येतेय पाणी.

महत्वाच्या बातम्या

By

Published : May 29, 2019, 9:08 AM IST

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक

मुंबई - वैद्यकीय विद्यार्थिंनी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. अंकिता खंडेलवालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

भागवत यांच्यानंतर शिवसेनेने आळवला राम राग, म्हणाले- रामाचे काम होणारच

मुंबई - देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच भाजप प्रणित एनडीएला मतदारांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कौल दिला. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात प्रभू रामचंद्राचे काम करायचे आहे आणि रामरायाचे काम होणारच असे वचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामाना'तून यावर भाष्य करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

गोंदियात भरचौकात २२ वर्षांच्या तरुणाची हत्या, दगडाने ठेचले डोके

गोंदिया - शहरात मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका २२ वर्षांच्या तरुणाची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली. ही घटना शहरातील नेहरू चौकामध्ये घडली. मुना शर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाचा सविस्तर...

बारावी परीक्षेत नापास झाल्यामुळे एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्याने शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वाचा सविस्तर...

नदी आटल्याने मोहाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई; ३ दिवसांनी येतेय पाणी

भंडारा - मोहाडी तालुक्यातील सूर नदी पूर्णपणे आटल्याने मोहाडी शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तीन ते चार दिवसानंतर पाणी मिळत असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. प्रकल्पातील पाणी मिळाल्यास या पाण्याच्या समस्येवर मात करता येईल, असे नगराध्यक्ष यांनी सांगितले. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details