महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...( रविवार ०९ जून २०१९) सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर... - कुंभमेळा

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार : भाजपचे तीन, तर तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू. CRICKET WORLD CUP : क्रिकेटविश्‍वाच्या कुंभमेळ्यात आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान. सोलापुरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. खेडमध्ये ढोकळा खाल्ल्याने ५ लहान मुलांना विषबाधा. दहावीत पास झाल्याच्या आनंदावर विरजण, वाटलेल्या पेढ्यांतून सात जणांना विषबाधा.

सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

By

Published : Jun 9, 2019, 9:00 AM IST

Updated : Jun 9, 2019, 9:28 AM IST

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार : भाजपचे तीन, तर तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. या घटनेत ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ कार्यकर्ते भाजपचे तर १ तृणमूल काँग्रेस पक्षाचा आहे. बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बासिरहाट शहरात ही घटना घडली. तर दुसरीकडे बंगालच्याच दिनाजपूर जिल्ह्यात विजयी मिरवणूक काढण्यावरून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत हिंसाचार झाला. यात पोलिसांसह अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर...

CRICKET WORLD CUP : क्रिकेटविश्‍वाच्या कुंभमेळ्यात आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान

लंडन - क्रिकेटविश्‍वातील सर्वात मोठी स्पर्धा अशी ओळख असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वकरंडकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया हे २ दिग्गज संघ ऐकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी खुप महत्वाचा आहे, कारण दोन्ही संघ हे या विश्वकंरडकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. वाचा सविस्तर...

सोलापुरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ

सोलापूर - शहरात आज भल्या सकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सोलापूरकरांना दिलासा दिला आहे. वाचा सविस्तर...

खेडमध्ये ढोकळा खाल्ल्याने ५ लहान मुलांना विषबाधा

रत्नागिरी - मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्ल्याने ५ लहान मुलांना विषबाधा झाल्याची घटना खेडमध्ये घडली. विषबाधा झालेली सगळी मुले ही सुसेरी नंबर 2 येथील आहेत. या सर्व मुलांवर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर...

दहावीत पास झाल्याच्या आनंदावर विरजण, वाटलेल्या पेढ्यांतून सात जणांना विषबाधा

ठाणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी (८ जून) दहावीचा निकाल घोषित केला. दहावीत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. मात्र, संभाजीनगर येथे दहावीत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मिठाईच्या दुकानात आणलेले पेढे खाल्याने उत्तीर्ण विद्यार्थिनीसह एकाच कुटुंबातील पाच अशा सात जणांना विषबाधा घडल्याने खळबळ उडाली आहे. सर्व बाधितांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने सर्वांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. वाचा सविस्तर...

Last Updated : Jun 9, 2019, 9:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details