महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी पहा एका क्लिकवर - urmila matondkar

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा, हिंदु जनजागृती समितीची मागणी.. डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल, 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश.. तर डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कोणाचीही तक्रार आली नाही, नायर रुग्णालयाचा दावा.. शालेय पुस्तकात सावरकरांचा 'पोर्तुगालचे पुत्र' असा उल्लेख, राजस्थान सरकारचा प्रताप..उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पणजी

By

Published : May 27, 2019, 11:56 PM IST

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा; हिंदु जनजागृती समितीची मागणी

पणजी - भारताच्या संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द असंवैधानिकरित्या सामाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. अधिक वाचा

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण: महिला आयोगाने घेतली दखल, 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई - रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आयोगाने मुंबईतील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली आहे. त्याबरोबरच कारवाई करण्यासोबत रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे. अधिक वाचा

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कोणाचीही तक्रार आली नाही; नायर रुग्णालयाचा दावा

मुंबई- डॉक्टर पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, या मागणीसाठी आज नायर रुग्णालयाच्या बाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केली. संबंधित आरोपींना नायर रुग्णालयातील प्रशासनाची फूस असून पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई का केली नाही? असा प्रश्नदेखील निदर्शन कर्त्यांनी यावेळी उपस्थित केला. अधिक वाचा

शालेय पुस्तकात सावरकरांचा 'पोर्तुगालचे पुत्र' असा उल्लेख, राजस्थान सरकारचा प्रताप

जयपूर - विनायक दामोदर सावरकर हे पोर्तुगालचे पुत्र होते, असा मजकूर राजस्थानच्या शालेय पाठ्यपुस्तकात छापण्यात आला आहे. यावरून राजस्थानमध्ये चांगलेच वादंग उठले आहे. या प्रकारानंतर भाजपनेही काँग्रेस सरकारला धारेवर धरले आहे. अधिक वाचा

उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात अखेर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय कुडतरकर असे या इसमाचे नाव आहे. माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अधिक वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details