मुंबई - ईटीव्ही ग्रुप आणि ईटीव्ही भारत यांच्यावतीने कोरोना विषाणूबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक खास मराठी गीत तयार करण्यात आले आहे. या गाण्याद्वारे कोरोनाशी संबंधित प्रत्येक महत्वाची माहिती सामायिक करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, कोरोनाच्या या लढाईत प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करणार्या लोकांचेही विशेष आभार मानण्यात आले आहेत. प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली भैसणे-माडे यांनी हे गीत गायले आहे.
हेही वाचा...चिमुकल्या आरतीने 'कोरोनाबाबत जागरुकते'साठी गायले गाणे, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेंकडून कौतुक