नाशिक - हा विषय वैयक्तिक घेतला जातोय, कायद्याचा वापर करून कारवाई केली आहे. महिला अत्याचार किंवा शेतकऱ्यांसाठी असे लढले असते तर मला आनंद झाला असता, असे मंत्री भारती पवार म्हणाल्या. भाजपचा विचार असा आहे की संयम ठेवला पाहिजे आणि आम्ही तो ठेवला आहे. भारताच्या बाबतीत विषय होता तो वैयक्तिक घेऊन कारवाई केली, असेही त्या म्हणाल्या. आमची कार्यालये फोडणाऱ्यांचे मुख्यमंत्री कौतुक करून प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे. वैयक्तिक गोष्टींमुळे लोकशाही धोक्यात आहे हे लोकशाहीला मारक आहे, असेही त्यांनी सांगितले.
नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, तर जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली - undefined
22:46 August 25
हा विषय वैयक्तिक घेतला जातोय - भारती पवार
20:30 August 25
नवी मंगळवारी परिसरातील तलाव सौंदर्यीकरण करण्यासाठी आपचे मुंडन आंदोलन
नागपूर -नागपूर शहरातील नवी मंगळवारी परिसरातील तलाव सौंदर्यीकरण करण्यासाठी आम आदमी पक्षाने साखळी उपोषण सुरू केलं, असून आज मुंडन आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका महिलेनेसुद्धा मुंडन केलं असून, शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदवला आहे. नवी मंगळवारी परिसरात प्राचीन तलाव आहे. या तलावात नागरिकांच्या घरातील गडरचे पाणी जाऊन हा तलाव दुषित झाला आहे. यामुळे परिसरात घाण वास येऊन रोगराईसुद्धा वाढत आहे.
16:26 August 25
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली
सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली असल्याची माहिती सिंधुदुर्गचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली आहे. दोन दिवसांत यात्रेचे रिशेड्युल होणार आहे.
16:25 August 25
नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा
मुंबई -नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. नारायण राणेंना चौकशीसाठी कुठेही हजेरी लावण्याची गरज नाही. जामीनाच्या अटीशर्ती मात्र पूर्ण कराव्याच लागतील.
16:13 August 25
नारायण राणेंना १७ सप्टेंबरपर्यंत कोर्टाचा अंतरिम दिलासा
मुंबई - नारायण राणे यांनी २३ ऑगस्टला केलेले वक्तव्य प्रक्षोभक नव्हते, असे राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितले आहे. त्यामुळे नारायण राणेंना १७ सप्टेंबरपर्यंत कोर्टाचा अंतरिम दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारचा युक्तिवाद -
याचिकेची प्रत आम्हाला काहीवेळापूर्वीच मिळाली आहे. ती नीट तपासायला थोडा वेळ लागेल. याचिकाकर्त्यांना अटक होऊन जामीन मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनाही याचिकेत सुधारणा करायला वेळ लागेल.
13:47 August 25
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा
नालासोपारा -परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा, नालासोपाऱ्यातील राणे समर्थकांची मागणी
विरार-केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे. याबाबतचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. परिवहन मंत्री परब यांचे हे कृत्य कोणत्या कायद्यात बसते? असा प्रश्न करत नालासोपारा येथील राणे समर्थक व भाजपचे उपजिल्हाध्यक्ष विश्वास सावंत यांनी परिवहन मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
13:25 August 25
- परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या
- चौथ्यांदा चांदीवाल आयोगासमोर गैरहजर
- चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांना २५ हजार रुपयांचा दंड
12:53 August 25
नाशिक शहरात शिवसेनेकडून सामना अग्रलेखाचे फलक :
नाशिक शहरात शिवसेनेकडून सामना अग्रलेखाचे फलक :
- शिवसेना मा.महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी लावले फलक
- भोक पडलेला फुगा अशा आशयाचा अग्रलेख लेख असलेल्या सामनाचे शहरात फलक
- सेनेच्या फलक बाजीने शहरात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता
- पोलिसांकडून फलक हटविण्यासाठी बोरस्तेना सूचना मात्र बोरस्तेकडून फलक हटविण्यास नकार
12:51 August 25
शोभा फडणवीस यांना पुत्रशोक :
नागपूर - राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (वय ५४) यांचे आज बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने नागपुरात निधन झाले. अभिजीत यांना नागपुरातच हृदय विकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे ते चुलत बंधु होते. अभिजित फडणवीस यांच्यावर आज नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
12:14 August 25
नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :
- पंढरपूरात नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले होते. पंढरपुरात संचारबंदी लागू असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंढरपूर विभागाची जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
12:13 August 25
नारायण राणेंना नोटीस -
नाशिक -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोन सप्टेंबरला नाशिकमध्ये हजर राहण्याची नोटीस दिली आहे.
- मंत्री महोदयांनी नोटीस स्वीकारली
- मंत्री महोदय आम्हाला तपासात सहकार्य करत आहेत
- दोन तारखेला जर नारायण राणे नाशिकमध्ये हजर न राहिल्यास पुढची कारवाई केली जाईल - पोलीस आयुक्त दीपक पांडे
11:09 August 25
परमबीर सिंह यांना चौथा समन्स :
मुंबई - परमबीर सिंह यांना आज चांदीवाल आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी चौथा समन्स पाठवण्यात आला.
- परमबीर आज आयोगासमोर यावे लागेल, जेव्हा ते त्यापूर्वी आले नाही, तेव्हा 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला
- आयोगाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती
- या याचिकेवर न्यायालयाने आज कोणतेही निर्देश दिले नाहीत.
09:56 August 25
नारायण राणेंची उच्च न्यायालयात धाव -
मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात आज राणेंच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी राणेंनी ही याचिका दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआरपीसी कलम 41(a) अंतर्गत नोटीस न बजावताच कारवाई कशी सुरू केली? असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) नारायण राणेंना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नव्हता. तसेच राणेंच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता. यानंतर रितसर याचिका दाखल करून तातडीच्या सुनावणीसाठी पुन्हा प्रयत्न करणार, अशी नारायण राणेंच्या वकिलांनी माहिती दिली होती.
09:38 August 25
सेंसेक्समध्ये वधारला
सेन्सेक्स 184 अंकांनी वधारला, सध्या 56,143.41 वर आहे; निफ्टी 16,698.50 वर आहे.
09:32 August 25
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. राणे मुंबई, जुहू येथे निवासस्थानी पोहोचले आहेत, जिथे शिवसैनिकांनी काल गोंधळ घातला होता. भाजपचे मोठे नेते राणेंना भेटायला येऊ शकतात.
08:56 August 25
मुंबई -आयकर विभागाने मंत्रीछगन भुजबळ यांची शंभर कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. यात समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या मालमत्तेचा ही समावेश असल्याचे ते म्हणाले आहेत.
08:19 August 25
श्रमिक मुक्ति दलाच्या संस्थापक डॉ. गेल ऑम्वेट यांचे निधन
07:59 August 25
शिवसेना-भाजप राडा प्रकरण
नाशिक - शिवसेना- भाजप राडा प्रकरण
- 100 हुन अधिक जणांवर भद्रकाली पोलोस ठाण्यात केले गुन्हे दाखल
- गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सेना-भाजप अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा समावेश
07:54 August 25
नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :
नाशिक - नाशिक पोलिसांची नारायण राणेंना नोटीस
दोन सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश
07:11 August 25
नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :
केंद्रीय मंत्री नारायण राणे बुधवारी पहाटे 5:00 वाजता मुंबईच्या जुहू येथे घरी पोहोचले. पोलिसांनी त्याला मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला रायगड जिल्ह्यातील महाड दिवाणी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयाकडे राणे यांची 7 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
06:57 August 25
नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :
मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळालेला जामिन ही राज्य सरकारला बसलेली एक जोरदार चपराक आहे, असे प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार गुंड आणि पोलिसांच्या मदतीने चालवले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.
TAGGED:
नारायण राणेंना जामीन