गुवाहाटी -तालिबानींच्या समर्थनार्थ समाज माध्मयात पोस्ट करणे आसाममधील नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. अशा पोस्ट करणाऱ्या 14 नागरिकांना आसाम पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य, आयटी कायदा अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.
BREAKING : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन - बिग ब्रेकिंग
21:44 August 21
यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन
19:42 August 21
तालिबानींच्या समर्थनार्थ पोस्ट करणे पडले महागात...14 जणांना आसाम पोलिसांकडून अटक
19:35 August 21
तालिबानचा पहिला फतवा, हेरातमध्ये मुला-मुलींचे सहशिक्षण केले बंद!
काबूल - युद्धग्रस्त अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने आपला पहिला "फतवा" जारी करत हेरात प्रांतात मुला-मुलींचे सहशिक्षण बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तालिबानच्या अधिपत्याखालील नव्या अफगाणिस्तानात नागरिकांना कशा परिस्थितीचा सामना करावा लागेल याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो.
18:49 August 21
ताब्यात घेतलेल्या भारतीयांची तालिबानींनी केली सुटका
नवी दिल्ली -तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे सोडले आहे. तालिबानींनी भारतीय नागरिकांच्या गटाला थांबवून काबुल विमानतळानजीक अज्ञात ठिकाणी शनिवारी नेले होते.
तालिबानी दहशतवाद्यांनी काही भारतीयांना व्हेरिफिकेशन आणि प्रवासाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली होती. त्यांना अज्ञात ठिकाणी नेले होते. त्यामुळे भारतामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. भारतीयांना कोणताही हानी नसल्याचे सुत्राने सांगितले. अफगाणिस्तानमधील माध्यमाच्या माहितीनुसार 150 भारतीय हे काबुल विमानतळाच्या दिशेने जात होते. त्यांना तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केल्याचे एका पोर्टलने म्हटले होते. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर भारतीयांची सुटका करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले होते. हे नागरिक काबुल विमानतळाच्या दिशेने जात असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
18:44 August 21
नालासोपाऱ्यात दोन अज्ञातांनी केला दुकानदाराचा खून
पालघर/नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेच्या साक्षी ज्वेलर्सवर शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून यात दुकान मालक किशोर जैन यांची हत्या करण्यात आली आहे. यात सोन्या चांदीचा लाखोंचा ऐवज लुटला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
नालासोपारा पाश्चिम एसटी डेपो मार्गा वर साक्षी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी 10:40 च्या दरम्यान दुकानाचे मालक किशोर जैन यांनी उघडले आणि ते एकटेच होते. यात हल्लेखोरांनी जैन यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली.
14:00 August 21
भर पावसात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रा
वसई-विरार शहरात आज (शनिवारी) सकाळपासून पावसाने जोरादार सुरुवात केली आहे. या भर पावसात वसईत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे.
वसई पूर्वेतील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथून या यात्रेची सुरुवात झाली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ढोल ताशाच्या गजरात मंत्री राणे यांचे स्वागत केले. वसईच्या दौऱ्यावर आलेले राणे वसई-विरारच्या विविध ठिकाणी भेट देणार असून यात कोणती घोषणा करतात याकडे साऱ्या वसईकरांचे लक्ष लागले आहे.
वसई विरारच्या भागात मोठ्या प्रमाणात लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत. त्याठिकाणी मोठ्या संख्येने कामगार वर्ग काम करतात अशा औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कोणती महत्त्वपूर्ण घोषणा करतात, याकडे उद्योजकांचे ही लक्ष लागले आहे.
13:02 August 21
80 मेंढ्यांचा मृत्यू :
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे हैदराबादकडे मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक उलटून त्यात एक मजूर अन 80 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील इतर पाच मजुरांना वाचवण्यामध्ये ग्रामस्थांना यश आले आहे.
13:01 August 21
रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
जालना : काँग्रेसने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; कालच्या वक्तव्यचा केला निषेध
12:01 August 21
नागपूर पोलीस आयुक्त :
नागपूर पोलिसांनी अफगाणी नागरिक समजून अफगाणिस्तानला परत पाठवलेला नूर मोहम्मद तालिबानी दहशतवादी असल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. याबाबत नागपूर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली.
12:00 August 21
जनआशिर्वाद यात्रा :
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेविरोधात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण 36 एफआयआर नोंदवले.
11:57 August 21
परमबीर सिंह प्रकरण :
काल रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी सीपी परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला. सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हा चौथा गुन्हा आहे. निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे हेही या प्रकरणात आरोपी आहेत.
11:48 August 21
अल-जब्रिया कोर्ट इमारत :
आयकर विभागाने बेनामी संपत्ती कायद्याअंतर्गत मरिन ड्राइव्ह येथील अल-जब्रिया कोर्ट इमारत तात्पुरती संलग्न केली आहे. ईडीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी या इमारतीची चौकशीही केली होती
10:33 August 21
सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्तीने पेटवून घेतले होते
ज्या व्यक्तीने 16 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक डी समोर स्वत: ला पेटवून घेतले त्याचा मृत्यू झाला आहे.
09:05 August 21
तीन दहशतवाद्यांचा खात्मा :
जम्मू-काश्मिरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यदलामध्ये चकमक सुरू आहे. यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्यदलाला यश आले आहे. या चकमकीत सैन्य दलासोबतच जम्मू काश्मिर पोलीस दलातील कर्मचारीही सहभागी आहेत. याबाबतची माहिती जम्मू काश्मिर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
08:59 August 21
दिल्लीत पाऊस :
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
08:47 August 21
BREAKING : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन
मुंबई -गुन्हे शाखेने शुक्रवारी जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील एका हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका टीव्ही अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. तर मॉडेल आणि दुसऱ्या टीव्ही अभिनेत्रीसह दोन जणांची सुटका करण्यात आली.