- अहमदनगर - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज (१८ जानेवारी) जाहीर होणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील आदर्शगाव हिवरे बाजार येथील ग्रामपंचायत निकाल स्पष्ट झाला असून सरपंच पोपटराव पवार यांच्या ग्रामविकास पॅनेलने सातही जागा जिंकल्या आहेत.
सविस्तर वाचा -हिवरेबाजारला ग्रामविकास पॅनलची बाजी; पोपटराव पवारांचे वर्चस्व सिद्ध
- औरंगाबाद - जिल्ह्यातील 'आदर्श गाव' अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणात भूकंंप झाला आहे. तीस वर्षे पाटोद्याच्या ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यांच्या मुलीलाही या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीचा हा निकाल भास्करराव पेरे पाटलांना धक्का देणारा ठरला.
सविस्तर वाचा -'आदर्श' गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटलांच्या पॅनलचा दारूण पराभव
- मुंबई- राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज (१८ जानेवारी) जाहीर होणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सविस्तर वाचा -राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज
- औरंगाबाद -ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) सकाळपासून होणार आहे. मतमोजणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. या मतमोजणीचा निकाल शांततेत स्वीकारा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -ग्रामपंचायत निवडणूक निकाल : जल्लोष केल्यास होणार कारवाई
- मुंबई- अर्णब गोस्वामी आणि बार्क माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हाटस्अॅप संभाषण बाहेर आल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यावरून आता शिवसेनेने अन्वय नाईक प्रकरणात अर्णबची बाजू घेणाऱ्या भाजपाला निशाण्यावर अर्णबने भाजपाचे तोंड काळे केले असल्याची टीका केली आहे.
सविस्तर वाचा -'गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले'
- नवी दिल्ली -आज सर्वोच्च न्यायालयात कृषी कायद्यांच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या माध्यामातून दाखल केलेल्या याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाला (२६ जानेवारी) शेतकरी संघटनांच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे. त्यामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गोंधळ होऊ शकतो. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना रॅली व आंदोलन थांबण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत केली गेली आहे.