महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - ashish shelar

कळंबोलीतील सुधागड हायस्कूलच्या समोरील मैदानात सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तू प्रकरणी संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर दुसरीकडे मंंबईत व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या दोघांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा तिढा सुटला असून शिक्षणमंत्र्यांनी जागा वाढवून देण्याचे आश्वासन दिले आहे. चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पुण्यात अमिताभ बच्चन यांच्या सारखे दिसणारे आणि अमिताभ सारखेच संवाद फेक करणारे शशिकांत पेडवाल आज सोशल मीडियावर खूप हिट झाले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घ्या.

संपादित छायाचित्र

By

Published : Jun 18, 2019, 11:49 PM IST

Updated : Jun 18, 2019, 11:56 PM IST

कळंबोलीतील बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरण: संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद

पनवेल- कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूचा सोमवारी मध्यरात्री खिडुकपाडा परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, शाळेसमोर बॉम्बसदृष्य वस्तू ठेवणाऱ्याचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. या चित्रीकरणावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेसह मुंबई एटीएसचे पथक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.वाचा सविस्तर...

शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन

मुंबई- शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. उद्या संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे आणि फडणवीस सायन येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. वाचा सविस्तर...

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा तिढा सुटला, शिक्षणमंत्र्यांनी दिले जागा वाढवून देण्याचे आश्वासन

मुंबई -शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. उद्या संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे आणि फडणवीस सायन येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. वाचा सविस्तर...

ऐकावे ते नवलच ! मुंबईत व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या दोघांना अटक; उलटीची किंमंत ऐकून व्हाल थक्क..

मुंबई - घाटकोपर पोलिसांनी प्रतिबंधित अशा व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १ किलो १३० ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. अंबरग्रीस हा खूप किमती पदार्थ आहे. याचा वापर सुगंधी द्रव्ये तसेच औषधे बनवण्यासाठी केला जातो. वाचा सविस्तर...

पाहा, चाहत्यांना चकित करणारे हुबेहुब अमिताभ

पुणे - सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चनचे आपण सर्वच जण चाहते आहोत. अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक स्टाईलची कॉपी केली जाते. मात्र अमिताभ बच्चन यांच्या सारखे दिसणारे आणि अमिताभ सारखेच संवाद फेक करणारे शशिकांत पेडवाल आज सोशल मीडियावर खूप हिट झाले आहेत. सध्या टिक टॅकवर त्यांचा व्हिडीओ चांगलाच गाजतोय.वाचा सविस्तर...

Last Updated : Jun 18, 2019, 11:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details