महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता.. रात्री १२ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - YAVTMAL

पहिल्याच पावसात मुंबईची दैना.. पेंटाग्राफ व ओव्हरहेड वायर तुटल्याने तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत; जुन्नर : वादळी वाऱ्यात घर कोसळून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, वयोवृद्ध महिला गंभीर; पाणीटंचाईने घेतला बळी.. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू; जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका जवानाला वीरमरण

संपादीत छायाचित्र

By

Published : Jun 10, 2019, 11:59 PM IST

पहिल्याच पावसात मुंबईची दैना.. पेंटाग्राफ व ओव्हरहेड वायर तुटल्याने तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

मुंबई -मुंबईमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले असून या पावसामुळे मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या कोपर स्टेशनवर पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.वाचा सविस्तर...

जुन्नर : वादळी वाऱ्यात घर कोसळून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, वयोवृद्ध महिला गंभीर

पुणे -आज दुपारच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील ओतुर डुंबरवाडी येथील तेलदरा वस्तीवर वादळी वाऱ्यात घर कोसळून घरातील 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये एक वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. वैष्णवी विलास भुतांबरे, (वय 6) आणि कार्तिक गोरक्ष केदार (वय 2) असे घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. तर चिमाबाई केदार (वय 70) असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे.वाचा सविस्तर...

पाणीटंचाईने घेतला बळी.. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू

यवतमाळ-महागाव तालुक्यातील माळेगाव येथे भीषण पाणीटंचाईने एका महिलेचा बळी घेतला आहे. पाणी भरण्यासाठी गेलेल्या विमल राठोड या महिलेचा 45 फूट खोल विहीरीत पडून मृत्यू झाला.वाचा सविस्तर...

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका जवानाला वीरमरण

पूंछ -जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याला प्रत्युत्तर देताना भारताच्या एका जवानाला वीरमरण आले. याआधी पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमधील राजौरी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.वाचा सविस्तर...

दोस्त दोस्त ना रहा ! औरंगाबादमध्ये उधारी मागितली म्हणून मित्राला जिवंत जाळले

औरंगाबाद -दुचाकी घेण्यासाठी हात-उसने दिलेले 3 हजार रुपये मागणाऱ्या मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश नामदेव दिवेकर (वय 32 रा. पंढरपूर. ता. जि. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.वाचा सविस्तर...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details