महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...संध्याकाळी ७ पर्यंत महत्वाच्या बातम्यांवर एक नजर

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला असून धवनच्या जागेवर आता ऋषभ पंतची वर्णी लागणार आहे. दुसरीकडे देशातील सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी RSS जबाबदार असल्याचा आरोप हिप हॉप गायिका हार्डकौरने केला आहे. तसेच रत्नागिरीच्या विशेष कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या घर कामासाठी चक्क कैद्यांना जुंपल्याचा धक्कादाक प्रकार उघड झाला आहे. जालना जिल्ह्यात राजूरहून जालन्याकडे जात असलेली कार चारवेळा पलटी होऊन झाडावर आदळली. इतका मोठा अपघात होऊन या कारमधील दोघेही सुखरुप आहेत. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी 'चेहरे' चित्रपटासाठी १४ मिनीटांचा सीन एकाच टेकमध्ये करत इतिहास रचला आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Jun 19, 2019, 6:59 PM IST

शिखर धवन विश्वकरंडकातून बाहेर, पंतची लागणार भारतीय संघात वर्णी

लंडन - भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने तो माघार घेत असल्यीची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.वाचा सविस्तर...

देशातील सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी RSS जबाबदार; गायिकेचा खळबळजनक आरोप

मुंबई - २६/११ चा हल्ला आणि पुलवामासह देशात होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप हिप हॉप गायिका हार्डकौरनं केला आहे. आपल्या सोशल मीडियावर तिने ही पोस्ट शेअर केली आहे. भारतातील सगळ्या समस्यांचे कारण आरएसएस असल्याचं तिनं म्हटलं आहे.वाचा सविस्तर...

कारागृह कर्मचाऱ्यांच्या घर कामासाठी चक्क कैद्यांना जुंपले, रत्नागिरीतील धक्कादायक घटना

रत्नागिरी - ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या सुरक्षेवर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी घरकामासाठी जुंपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ दिवसांपूर्वीच एक कैदी या कारागृहातून पळून गेला होता. त्यामुळे कारागृहाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.वाचा सविस्तर...

देव तारी त्याला कोण मारी.. कार चारवेळा पलटी होऊन झाडावर आदळली; दोघेही सुरक्षित

जालना - असे म्हणतात ना की, 'देव तारी त्याला कोण मारी'. ज्याचे-त्याचे नशीब त्याला साथ देत असते. याचाच प्रत्यय जालना जिल्ह्यातील एका वकीलाला आला. गाडीपुढे आलेला कुत्रा वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि गाडीने चार पलट्या घेतल्या. त्यानंतर गाडी झाडावर आदळली. मात्र, त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीला व त्यांना कोणतीही इजा झाली नाही.वाचा सविस्तर...

अमिताभने रचला इतिहास, १४ मिनिटांचा शॉट एक टेकमध्ये ओके

मुंबई- अभिनेता अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशाह म्हणतात. ही उपाधी त्यांना उगाच मिळालेली नाही. अत्यंत निष्ठेने ते दिग्दर्शकाला काय हवंय ते समजून घेतात आणि टेक देतात. अलिकडे 'चेहरे' चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी त्यांनी कमाल करुन दाखवली. १४ मिनीटे लांबलचक डायलॉग त्यांना म्हणायचा होता. तो त्यांनी चक्क एकाच टेकमध्ये करुन दाखवला. यामुळे निर्मात्यासह सेटवरचे सर्वचजण अवाक झाले.वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details