महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - घडामोडी

चंद्राबाबू नायडू यांनी भेटींचा सपाटा लावला असून राहुल गांधी, शरद पवार, मायावती, अखिलेश, केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. राज्यात वेगवेगळ्या घटनेत ६ जणांचा बुडून मृत्यू झाला. सनी देओलने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने निवडणूक आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे. मणिपूरमध्ये भाजप सरकारला धक्का बसला असून नागा पीपल फ्रंटने पाठिंबा काढला आहे. ममता बॅनर्जीं यांच्या भाच्याने पंतप्रधान मोदींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..

By

Published : May 19, 2019, 12:00 AM IST

चंद्राबाबूंचा भेटींचा सपाटा; राहुल गांधी, शरद पवार, मायावती, अखिलेश, केजरीवाल यांच्याशी चर्चा
नवी दिल्ली - भाजप विरोधात विरोधकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भेटीचा सपाटा लावला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बसप प्रमुख मायावती, समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी चंद्राबाबू नायडूंनी चर्चा केली. वाचा सविस्तर..

शनिवार ठरला 'जला'घातवार; राज्यात वेगवेगळ्या घटनेत ६ जणांचा बुडून मृत्यू
मुंबई - राज्यात आज वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजचा वार हा जलाघात ठरला आहे. गडचिरोलीमध्ये दोन चुलत भाऊ, रायगडमध्ये दोन सख्खे भाऊ तर, मालवणमध्ये वडील आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाचा सविस्तर..

सनीच्या 'ढाई किलो'च्या हातून आचारसंहितेचे उल्लंघन, आयोगाने पाठवली नोटीस
नवी दिल्ली - अभिनेता सनी देओल याला आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी भाजपकडून निवडणूक लढवीत आहे. या मतदारसंघात १९ मे रोजी मतदान होणार आहे. वाचा सविस्तर..

मणिपूरमध्ये भाजप सरकारला धक्का, नागा पीपल फ्रंटने काढला पाठिंबा
इंफाळ - मणिपूर येथील भाजप सरकारचा एनपीएफ (नागा पिपल फ्रंट) पक्षाने पाठिंबा काढला आहे. एनपीएफ पक्षाचे प्रवक्ते अचुम्बेमो कीकॉन यांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याची माहिती माध्यमांना दिली. वाचा सविस्तर..

पंतप्रधान मोदींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा; ममता बॅनर्जींच्या भाच्याने पाठवली नोटीस
कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी वकिलामार्फत मोदी यांना नोटीस पाठवली आहे. वाचा सविस्तर..

ABOUT THE AUTHOR

...view details