सांगली - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली बोट कृष्णा नदीत उलटली असून यात 15 जण बुडाले आहेत. तसेच बोटमधील 16 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या बोटीत 30 जण असल्याची माहिती मिळत आहे.
11:22 - रत्नागिरीत दुधाचा तुटवडा; 12 तासांच्या खडतर प्रवासानंतर अवघे 3 हजार लिटर दूध आले रत्नागिरीत
11:20 - रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; पालकमंत्री गायब
11:05 - गोंदिया जिल्ह्यात 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने लावली हजेरी; शेतकऱयांना दिलासा
11:04 - मेळघाटात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला.
11:05 - गोंदिया जिल्ह्यात 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने लावली हजेरी; शेतकऱयांना दिलासा
10:59 - भंडाऱयात सकाळपासून पावसाला सुरुवात
10:50 - नागपुरात पावसाचा जोर वाढला, सकाळपासून रिमझिम सुरू
09.58 - नांदेड शहरातून दोन तरुणी बेपत्ता, विमानतळ आणि भाग्यनगर पोलिसात हरवल्याची नोंद दाखल
नांदेड- शहरातून दोन तरुणी बेपत्ता झाल्या असून विमानतळ आणि भाग्यनगर पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे.
09.53 - दक्षिण रत्नागिरीतल्या पेट्रोल पंपावर इंधनाचा खडखडाट
रत्नागिरी- दक्षिण रत्नागिरीतले सर्व पेट्रोल पंप काल दुपारपासून बंद आहेत. मिरज हजारेवाडीच्या डेपोतून निघालेले टॅकर पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यामुळे आज संपुर्ण दिवसभर इंधनाचे टँकर येणार नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. कुठल्याच पेट्रोलपंपावर इंधन मिळत नसल्याने सर्वसामान्य बेजार झाले आहेत. वाशीच्या इंधन डेपोतून काही गाड्या मागवण्यात आल्या आहेत.
9.41 - पूरपरिस्थितीमुळे मार्ड डॉक्टरांचा संप मागे
मुंबई- मार्ड डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी मोठी पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण, डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारने विचार करावा, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
7:58 - गोंदियात पावसाला सुरुवात
गोंदिया - जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे.
7:55 - कोल्हापुरातील पुराचा फटका; मुंबईत दुधाचा तुटवडा
मुंबई - पावसामुळे दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलन व वाहतूक बंदचा परिणाम मुंबईवर झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून दूध पुरेसे न आल्यामुळं गोकूळ दूध आज मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार नाही. अमुल, महानंदा आणि आरे दुधाचा पुरवठा सध्या केला जात आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुंबईकरांना दुधाचा तुटवडा जाणवणार आहे.
7:50 - अमरावती - पत्नीला तीनवेळा तलाक म्हणने पडले महागात; अमरावतीत सात जणांवर गुन्हा दाखल.
7.30 - कोयना धरण क्षेत्रात पाऊस मंदावला; कराडचा पुराचा धोका टळला
सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून, कोयना धरणाचे दरवाजे 13 फुटावर सध्या स्तिर आहेत. तसेच 1,20,000 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. यामुळे कराड शहराचा धोका टळला आहे.
07.10 - मुंबई
1- एमटीएनएल आग प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
2 - डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून पालिका सज्ज - अश्विनी जोशी
3 - स्थायी समितीचे आर्थिक अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव फेटाळला
4 - कंत्राटदार कंपन्यांबरोबर संचालकांनाही काळ्या यादीत टाका - स्थायी समितीत मागणी
5 - बेस्टला ११३६.३१ कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी