महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद काँग्रेसने निर्माण केलेलं भूत - सदाभाऊ खोत - Maharashtra News

Breaking News
ब्रेकिंग न्यूज

By

Published : Dec 10, 2022, 11:42 AM IST

Updated : Dec 10, 2022, 9:24 PM IST

21:23 December 10

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद काँग्रेसने निर्माण केलेलं भूत - सदाभाऊ खोत

सांगली -महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा भूत हे काँग्रेसने निर्माण केलेला "भूत" असल्याचा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.पन्नास वर्षे काँग्रेसचे राज्यात आणि देशांमध्ये सत्ता होती,मग हे भूत का गाडता आले नाही ? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.

21:23 December 10

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात वीस वर्ष शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयातून दिलासा

मुंबई -अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्हामध्ये विशेष सत्र न्यायालयातील पॉक्सो कोर्टाने आरोपीला 20 वर्षाची शिक्षा सुनावली होती या विरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पीडित तरुणीच्या जन्मतारीख विसंगती असल्याने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. सदर घटना 2020 मध्ये घडली होती.

21:23 December 10

अंबरनाथ बदलापूर ते खोपोली मार्गे मुंबई-पुणेला थेट जोडणी

मुंबई - कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कात्रप पेट्रोल पंप ते खरवई बाह्यवळण रस्त्याच्या भागामध्ये, काँक्रीटीचे रस्ते बनविण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले होते. त्या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीट चा रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे त्यामुळे लोकांना आता वाहतुकीची सोय झाली आहे.

21:23 December 10

किसचा सेल्फी घेऊन अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून मुलाने केला बलात्कार; ताब्यात घेतले

मुंबई:चुंबन घेतानाचा सेल्फी काढून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून त्याच वयाच्या मुलाने बलात्कार केल्याच्या आरोपाखाली १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

21:22 December 10

वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम सुपरफास्ट एक्स्प्रेस भुज पर्यंत धावणार

मुंबई - प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने ट्रेन क्रमांक १२९६५/६६ वांद्रे टर्मिनस - गांधीधाम सुपरफास्ट एक्स्प्रेसला ७ फेब्रुवारी २०२३ पासून भुजपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून ट्रेनच्या वेळा आणि ऑपरेशनचे दिवस देखील सुधारित केले जात आहेत.

19:39 December 10

महाराष्ट्रात उद्या पंतप्रधान 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार

नवी दिल्ली - महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील आणि नागपूर एम्सचे उद्घाटन करतील. मोदींनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

19:34 December 10

मी रडणारा नेता नाही तर लढणारा नेता - चंद्रकांत पाटील

पुणे - मी रडणारा नेता नाही तर लढणारा नेता आहे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होत.

18:50 December 10

सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची उद्या घेणार शपथ

सिमला - काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री तर मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री होणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ही माहिती दिली.

18:46 December 10

मंत्री चंद्रकांत पाटलांचा भांग विस्कटणाऱ्याला 2 लाख रुपयांचे बक्षीस

सोलापूर - मंत्री चंद्रकांत पाटलांचा भांग विस्कटणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. येथील भीम सैनिकांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. भीम सैनिकांनी चंद्रकांत पाटील यांचे प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करून निषेधही केला.

18:36 December 10

पिंपरीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

पिंपरी (पुणे) - चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. चिंचवडमधील भाजप पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पाण्यासाठी थांबले होते. चहा पाणी करून ते कार्यक्रमासाठी निघाले असता अज्ञात व्यक्तीने थेट त्यांचा तोंडावर शाई फेकली. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे पडता पडता वाचले. दरम्यान, उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळाच्या जवळच आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला होता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

18:32 December 10

चुंबन सेल्फी काढून ब्लॅकमेल आणि बलात्कारप्रकरणी एकजण मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई - एका 17 वर्षीय मुलाला त्याच्याच वयाच्या एका मुलीवर सेल्फी काढून ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

18:22 December 10

माेबाईलसाठी वडील पैसे देत नसल्याने तरुणाची आत्महत्या

नाशिक : नवीन माेबाईल खरेदी करण्यासाठी वडील पैसे देत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने साेसायटीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सातपूर परिसरातील श्रमिक नगरात मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

18:13 December 10

अजित पवारांनी पुणे-पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेवकांची उद्या बोलावली बैठक

पुणे -पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवार आतापासूनच कामाला. उद्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेवकांची बोलावली बैठक. सुरुवातीला पुण्यातील माजी नगरसेवकांची 2 ते 3 आणि नंतर पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार देणार कानमंत्र. नगरसेवकांना कामाला लागण्याचे पक्षाचे आदेश. उद्या अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रात पक्ष मजबुतीसाठी करणार दौरा.

17:33 December 10

कर्नाटकचे खासदार अमित शाह यांची भेट घेणार - बोम्मई

बंगळुरू - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी आमचे खासदार केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून कर्नाटकची भूमिका स्पष्ट करणार आहेत. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी अमित शाह लवकरच बैठक बोलावतील. त्यांनी फोन करताच मी जाईन आणि मीटिंगला उपस्थित राहीन असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.

17:07 December 10

RSS संलग्न BMS 28 डिसेंबर रोजी केंद्राच्या आर्थिक धोरणांविरोधात 'महामोर्चा' काढणार

नागपूर -केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश युनिट २८ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढणार आहे.

17:01 December 10

महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्यातील जनतेने संयम बाळगावा - सी.टी.रवी

बंगळुरू - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे प्रकरण कोर्टात आहे. हा खूप जुना मुद्दा आहे. दोन्ही राज्यातील जनतेने संयम बाळगावा. दोन्ही राज्यांमध्ये खूप आपुलकीचे संबंध आहेत. तसेच न्यायालय जो निकाल देईल त्याचे पालन केले पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी यांनी म्हटले आहे.

16:35 December 10

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंग सुखू यांना हायकमांडची पसंती

शिमला - हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे. इतर नेत्यांशी चर्चा करून आज सायंकाळपर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

16:22 December 10

नाशिकच्या देवळाली परिसरातून नर बिबट्याला पकडून सोडले जंगलात

नाशिक -देवळाली परिसरातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एका नर बिबट्याची सुटका केली आहे. या बिबट्याला पकडून जंगलात सोडन देण्यात आले. केव्ही शाळेजवळून त्याची सुटका करण्यात आली आहे. परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता असल्याने लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नाशिकचे आरएफओ विवेक भदाणे यांनी ही माहिती दिली.

16:00 December 10

पंतप्रधानांची मन की बातमधील भाषणे प्रकाशित करण्याचा दावा करून फसवणूक प्रकरणी संपादकावर गुन्हा दाखल

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमातील भाषणांचे संकलन करून छापणार असल्याचा दावा एकजण करत होते. त्यावरुन पैसे उकळून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका स्थानिक प्रकाशनाच्या संपादकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

15:36 December 10

भारताच्या बांगलादेशविरुद्ध ५० षटकांत 8 बाद 409 धावा

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध ५० षटकांत 8 बाद 409 धावा केल्यात. यामध्ये किशनने जोरदार २१० धावांची खेळी केली. तर कोहली ११३ धावा ठोकल्या.

15:10 December 10

आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेची काळजी सरकार घेणार - मंगल प्रभात लोढा

मुंबई -आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेकरता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ७ ते १० दिवसांत सरकारकडून १० सदस्यीय समिती नेमण्यात येणार आहे. या समितीकडून आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबईत ते बोलत होते.

14:57 December 10

विराट कोहलीचे 72 वे आंतरराष्ट्रीय शतक, रिकी पाँटिंगला टाकले मागे

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 72 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकून रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध 38.4 षटकात भारताने 3 बाद 329 धावा केल्या आहेत.

14:45 December 10

बीड जिल्ह्यात पकडला 2 लाख 70 हजाराचा गांजा

बीड - आष्टी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 2 लाख 70 हजाराचा गांजा.

14:25 December 10

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनचे द्विशतक

बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने द्विशतक ठोकले आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध ३५ षटकांत 1 बाद 295 धावा केल्या आहेत.

14:20 December 10

ठसकेबाज शैलीने सुलोचना चव्हाण यांनी लावणीला वेगळ्या उंचीवर नेले - शरद पवार

मुंबई - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल दुःखद व्यक्त केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'बुलंद आवाज व ठसकेबाज शैलीने त्यांनी लावणीला एका वेगळ्या उंचीवर नेले. ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मला हो म्हणतात लवंगी मिरची.., सोळावं वरीस धोक्याचं..., उसाला लागलं कोल्हा... अशा अनेक लावण्या त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केल्या. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लावणीचा आवाज पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'

14:07 December 10

औरंगाबादमध्ये काळे झेंडे दाखवून चंद्रकांत पाटील यांचा निषेध

औरंगाबाद - भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी संस्थान गणपती परिसरात सदस्य नोंदणी कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र शहरात विविध स्तरातून त्यांचा विरोध केला जातोय.

13:22 December 10

सुलोचना चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होणार - मुख्यमंत्री

मुंबई - लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. सुलोचनाताईंवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

13:05 December 10

मुंबई ३० वर्षे खड्डेमुक्त राहतील असे रस्ते बनवू - उपमुख्यमंत्री

मुंबई - मुंबई ३० वर्षे खड्डेमुक्त राहतील असे रस्ते बनवू, असे राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकल्पांतर्गत दर्जेदार कामे व्हावीत यासाठी आम्ही उपग्रहाद्वारे या रस्त्यांच्या जीवनचक्रावर लक्ष ठेवू, असेही ते म्हणाले. मी किंवा मुख्यमंत्री कोणालाही बीएमसीला पैसे कमविण्याचे मशीन बनवू देणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

13:02 December 10

वैजापुरात मंदिरामागे आढळला एका महाराजांचा मृतदेह

औरंगाबाद - वैजापुरात मंदिरामागे आढळला एका महाराजांचा मृतदेह. खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

12:49 December 10

मी टोपी घालत नाही तसेच कुणाला टोपी घातली नाही - उद्धव ठाकरे

मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मी टोपी घालत नाही तसेच कुणाला टोपी घातली नाही असे ते म्हणाले आहेत.

12:40 December 10

ब्रेक फेल झाल्याने खंडाळा घाटात उतारावर ट्रक सुसाट

खंडाळा घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे उतारावर ट्रक सुसाट चालल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या ट्रकने काही वाहनांना धडक दिली. तर रेलिंगला ट्रक धडकल्याने काही वाहने वाचली आहेत.

12:35 December 10

ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन

गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी लहान असताना वयाच्या नऊव्या वर्षापासून त्यांनी गायनास सुरुवात केली. हिंदी मराठी चित्रपटातील अनेक गाणी त्यांनी अजरामर केली आहेत.

12:30 December 10

भीक शब्दाने कुणी दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास तयार - चंद्रकांत पाटील

औरंगाबाद - कालच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार निदर्शने होत आहेत. त्यावर जर भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असे मोठे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. माझ्या रक्तात आंबेडकर फुले आहेत. मी त्यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे, असेही ते म्हणाले. तरी देखील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे असेही ते म्हणाले.

12:27 December 10

महाविकास आघाडीचे 8 ते 10 आमदार संपर्कात - उदय सामंत

महाविकास आघाडीचे 8 ते 10 आमदार आपल्या संपर्कात आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. हे आमदार कधीही सत्ताधारी गटात सामिल होऊ शकतात असे ते म्हणाले.

11:55 December 10

रविवारी 11 तारखेला मुंबईत रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई - रविवारी 11 तारखेला मुंबईत रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे काही लोकल रेल्वे तसेच एक्सप्रेस ट्रेनवर परिणाम होणार होणार नाही. उपनगरामध्ये पाचव्या आणि सहाव्या लेनमध्ये काम सुरू असणार आहे. काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

09:40 December 10

Breaking News : सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत

बंगळूरू - महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ट्विट करुन त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Dec 10, 2022, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details