महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BREAKING : मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा फोन, स्कॉड घटनास्थळी दाखल - undefined

maharashtra breaking
महाराष्ट्र ब्रेकिंग

By

Published : Aug 6, 2021, 8:20 AM IST

Updated : Aug 7, 2021, 1:15 AM IST

01:12 August 07

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा फोन, स्कॉड घटनास्थळी दाखल

मुंबई -  मुबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची धक्कादायक माहिती एका निनावी फोनद्वारे रेल्वे विभागाला मिळाली आहे . त्यानंतर  तात्काळ रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले असून शोध मोहीम सुरू असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली आहे . सध्या मेन लाईन वेटिंग हॉल पूर्णपणे खाली करण्यात आला आहे. तसेच , स्थानकातील सर्व स्वच्छतागृह , खानपान स्टॉप यापासून तिकीट घर आदींची कसून तपासणी सुरू आहे

20:12 August 06

मुख्यमंत्र्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाची घेतली बैठक

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांचे प्रतिनिधीं यावेळी उपस्थित होते. हॉटेल व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडल्या.

19:53 August 06

नागपुरात तरुणीचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर - शहरातील इममवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणीची मुक्तता करण्यासाठी खंडणी मागितली होती. या संदर्भात पोलिसांना माहिती समजताच तासाभरात तरुणीची सुटका करत आरोपींना अटक केली आहे.

19:48 August 06

2022 च्या सुरुवातीला लहान मुलांसाठी लस होणार उपलब्ध - अदर पुनावाला

पुणे - कोवोव्हॅस लस ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लहान मुलांसाठी 2022 च्या सुरुवातीला लस उपलब्ध होणार असल्याची माहिती सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्र सरकार चांगले सहकार्य करत आहे. उत्पादनासाठी आर्थिक अडचण अजिबात निर्माण झाली नाही, असे म्हणत अदर पुनावाला यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.    

18:19 August 06

मराठा आरक्षण, 102 व्या घटनादुरुस्तीतील नवीन बदल ऐतिहासिक - विनायक मेटे

नाशिक - 102 व्या घटनादुरुस्तीतील नवीन बदल ऐतिहासिक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचेदेखील आभार व्यक्त करतो. मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.  

अशोक चव्हाण अगोदर अधिकार नाही म्हणून ओरडत होते. आता अधिकार दिले तर म्हणतात अधिकार देऊन काय उपयोग नाही. राज्य मागासवर्ग आयोगाने केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे अहवाल द्यावा. सर्वोच न्यायालयाने जी प्रक्रिया सांगितली आहे त्याच प्रक्रियेने जायला हवं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घ्यावी. अशोक चव्हाण यांच्याकडून ही जबाबदारी काढून घ्यावी ते निष्क्रिय आहेत, असे विनायक मेटे म्हणाले.

16:36 August 06

औरंगाबादेत पुन्हा पोलिसांना मारहाण; तिघांना अटक

औरंगाबाद -मदाधुंद तरुणांनी नाकाबंदीवरील पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार औरंगाबादेत पुन्हा घडला आहे. विनामास्क असल्याने थांबवल्याने दुचाकीवरील तिघांनी पोलिसांना मारहाण केली. पोलिसांना दगडाने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. प्रताप पोपटराव जगताप, आकाश सुनिक कुलकर्णी, आशुतोष नवनाथ झिंझोडे असे पोलिसांवर  हल्ला करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. सिडको पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

16:29 August 06

राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; जीवितहानी नाही

हिंगोली -राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात हिंगोलीत झाला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे. यात जीवितहानी झालेली नाही.  

पत्रकारांशी संवाद साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नरसी नामदेव येथे दर्शनासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहन चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ताफ्यातील  तीन वाहने एकमेकाला धडकल्याने वाहनांचे यात नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले आहे.  

16:08 August 06

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी

नागपूर - मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले आहे. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

13:35 August 06

अभिनेत्री शर्लिन चोप्राला राज कुंद्राला अटक करण्यात आलेल्या पोर्नोग्राफी प्रकरणांत चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पॉपर्टी सेलने समन्स बजावले होते. यानंतर ती आता सीबीआयच्या पॉपर्टी सेलच्या कार्यालयात दाखल झाली आहे.

13:21 August 06

शरद पवार बंगळुरुत

शरद पवार यांनी बंगळुरुत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली.  

12:51 August 06

केंद्र सरकारचा निर्णय

जनतेच्या मागणीनंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. 

12:03 August 06

प्रवीण दरेकरांच्या नेतृत्त्वात चर्चगेट येथे आंदोलन, पोलिसांनी अनेकांना घेतलं ताब्यात

लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता मा. न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु मा. न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का? - प्रवीण दरेकर

11:57 August 06

चंद्रकांत पाटील-राज ठाकरे भेट

भाजप नेते चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर दाखल; राज ठाकरेंची घेणार भेट

11:53 August 06

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे'

11:52 August 06

नागपूर -राज्य मागासवर्गीय आयोगाने ओबीसी समाजाचा इंपेरिकल डेटा तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे मनुष्यबळ आणि ४२८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. शासनाने सात दिवसांच्या आत मनुष्यबळ आणि 428 कोटी रुपये उपलब्ध करून दिले तरच डिसेंबरमध्ये इंपेरिकल डेटा जमा करून जानेवारीमध्ये ओबीसी आरक्षण देता येईल, अशी माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्य मागसवर्ग आयोगाने जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. सरकारने त्यांना सगळ्या सुविधा देणं आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

11:41 August 06

महेश राऊत मृ्त्यू प्रकरण :

नागपूर -पोलिसांच्या मारहाणीनंतर महेश राऊत याने अपमानित झाल्याने आत्महत्या केली. राऊत कुटुंबियांचे सांत्त्वन करत पाठीशी असल्याचे भाजप नेत्या चित्रा राऊत म्हणाल्या.

  • मुख्यमंत्री गृहमंत्री तुमच्या राज्यात काय चाललंय?
  • पोलिसांच्या मारहाणीमुळे राऊत कुटुंबाचे छत्र हरवले, याची जबाबदारी मुख्यमंत्री घेणार का?
  • लोकांची मदत करणे चूक आहे?
  • यात काय करवाई होणार का, असा सवाल त्यानी केला.
  • पोलिसांच्या नीचपणाचा कळस आहे. आपले पाप लपवण्यासाठी पती पत्नीचे घरात भांडण झाल्याचे सांगत आहेत. - चित्रा वाघ

10:34 August 06

राज्यपालांचा दौऱ्याचा दुसरा दिवस :

राज्यपालांचे हिंगोली येथे आगमन

10:28 August 06

आशिष शेलार यांनी केलेले ट्विट्स

राज्यात फक्त काय द्यायचे राज्य आहे का?; भाजप नेते आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका

09:51 August 06

टोकियो ऑलिम्पिक अपडेट :

कुस्तीपटू बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक; इराणच्या खेळाडूला नमवले

09:26 August 06

टोकियो ऑलिम्पिक अपडेट :

कुस्तीपटू बजरंग पुनियाची उपांत्यपूर्व फेरीत धडक; किरगिझस्थानच्या खेळाडूला 65 किलो वजनीगटात नमवले

08:57 August 06

टोकियो ऑलिम्पिक : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

08:22 August 06

टोकियो ऑलिम्पिक - महिला हॉकीमध्ये भारताला पदकाची आशा

भारताच्या महिला हॉकी संघालाही पदकाची आशा आहे. सद्या सुरू असलेल्या सामन्यात भारत ब्रिटन विरुद्ध ३-३ ने बरोबरीत आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताची ही बरोबरी झालेली आहे. पुढील निर्णय काय लागतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

08:04 August 06

मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स बजावण्यात आले आहे. राज कुंद्राला अटक करण्यात आलेल्या पोर्नोग्राफी प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी तिला आज हजर होण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 

08:04 August 06

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भाजप कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही. - चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष, भाजप)

07:59 August 06

BIG BREAKING : मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा फोन, स्कॉड घटनास्थळी दाखल

मुंबई -मनसेची परप्रांतीयांबाबतची भूमिका आम्हाला स्वीकार नाही. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मतभेद असूनही एकमेकांना भेटणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Last Updated : Aug 7, 2021, 1:15 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details