केंद्रात मंत्रीपदासाठी राज्यातील 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा
मुंबई - सलग दुसऱ्यांदा भाजपने केंद्रात घवघवीत यश मिळवले. नरेंद्र मोदी हे उद्या (गुरुवार) दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची मंत्रीपदासाठी नावे चर्चेत आहेत. मात्र, मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वाचा सविस्तर
तंबाखूने अर्थव्यवस्थेला 'चुना' नव्हे तर आर्थिक फायदा, संशोधन संस्थेचा अहवाल
नवी दिल्ली - तंबाखू क्षेत्र हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला योगदान देणारे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. तंबाखू क्षेत्रातने ११ हजार ७९ कोटी ४९८ रुपयांचे अर्थव्यवस्थेला योगदान दिल्याचे तारी या संशोधन संस्थेने म्हटले आहे.वाचा सविस्तर
मी भाजपत जाणार हे सांगणे म्हणजे वेडेपणा; विश्वजित कदमांचे स्पष्टीकरण
पुणे - काँग्रेस आमदार विश्वजित कदम भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, विश्वजित कदम यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जनतेचा आशिर्वाद घेऊन काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. वाचा सविस्तर
माझ्या संपर्कात एकही आमदार नाही; राधाकृष्ण विखे पाटलांचे स्पष्टीकरण
मुंबई - माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याविषयी गांभिर्याने विचार करत आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे आमदार येतील, अशा चर्चा सुरू असल्या तरी माझ्या संपर्कात सध्या कोणीही नसल्याचा खुलासा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. वाचा सविस्तर
सासऱ्याच्या निधनानंतर रुग्णालयात का दिसून आली अभिनेत्री काजोल?
मुंबई- विरु देवगण यांच्या निधनानंतर देवगण परिवार शोक सागरात बुडाला आहे. २७ मे ला त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधी दरम्यान अभिनेत्री काजोलही भावनाविवश होऊन रडत होती. त्यांच्या दुःखाचा सागर अजून संपला नसल्याचे दिसतंय. विरु देवगण यांच्या निधनाच्या एक दिवसानंतरच काजोल मुंबईच्या लिलावती रुग्णालयात जाताना दिसली. ती तिच्या आजारी आईला भेटायला गेली होती. वाचा सविस्तर