महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता.. सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर - eenadu

पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिन्ही संशयित आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी, यवतमाळ: दिग्रस तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, गॅलरीत अडकलेली ओढणी काढणे तरुणीच्या बेतले जीवावर; नाशिकमधील घटना, ठाण्यात दिवसाढवळ्या थरार..  पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून साडेबारा लाखांची रोकड पळवली, व्हिडीओ : पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा, अॅक्टिवाची धडक; महिला गंभीर जखमी

संपादित छायाचित्र

By

Published : May 31, 2019, 7:00 PM IST

Updated : May 31, 2019, 7:14 PM IST

पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिन्ही संशयित आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई -पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही संशयित आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली. गुन्हे शाखेने समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची न्यायालयाकडे मागणी केली. मात्र न्यायालयाने या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली.वाचा सविस्तर...

यवतमाळ: दिग्रस तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यवतमाळ- दिग्रस तालुक्यातील मांडवा या गावातील महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्पना अंकुश चव्हाण (२५), मुलगा युवराज (५) व मुलगी गुडिया (3) अशी मृतांची नावे आहेत.वाचा सविस्तर...

गॅलरीत अडकलेली ओढणी काढणे तरुणीच्या बेतले जीवावर; नाशिकमधील घटना

नाशिक - सातपूर येथील निळकंठेश्वर नगरातील थोरात पार्क इमारतीच्या छतावर वाळत असलेले कपडे काढताना तोल गेल्याने, उंचावरून पडून जखमी झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून तिची मृत्युशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. डिंपल शुक्ला असे या युवतीचे नाव आहे.वाचा सविस्तर...

ठाण्यात दिवसाढवळ्या थरार.. पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून साडेबारा लाखांची रोकड पळवली

ठाणे -कल्याण डोंबिवली शहरात गुन्हेगारांनी एकच धुमाकूळ घातला असून दिवसाढवळ्या नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना आज( शुक्रवारी) कल्याण पश्चिमेला घडली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने मारहाण करीत साडेबारा लाखांची रोकड लुटली. वाचा सविस्तर...

व्हिडीओ : पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा, अॅक्टिवाची धडक; महिला गंभीर जखमी

पालघर- पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. दरम्यान, ही सर्व घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.वाचा सविस्तर...

Last Updated : May 31, 2019, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details