महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता..रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - evm

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे साडेतीन वर्षीय मुलाचे कापावे लागले हात-पाय.. शौचालयाच्या टाकीत गुदमरून दोघांचा मृत्यू, वनीतील वेकोली वसाहतीतील घटना.. ईव्हीएमच्या रक्षणाची गरज पडल्यास हत्यारही उचलू  उपेंद्र कुशवाहा यांचे वक्तव्य.. राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील,  बाळासाहेब थोरातांचे मत..

पुणे

By

Published : May 21, 2019, 11:58 PM IST

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे साडेतीन वर्षीय मुलाचे कापावे लागले हात-पाय

पुणे - घराच्या गच्चीवर खेळत असताना विद्युत तारांशी संपर्क आल्याने साडेतीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचे दोन्ही हात व पाय कापावे लागले आहेत. ही दुदैर्वी घटना पुण्याच्या कात्रज परिसरात घडली. एमएसईबी आणि बिल्डिंग मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. या मुलाच्या पालकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आयुष्यभर मुलाला कसे सांभाळायचे हा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

सविस्तर वृत्त

शौचालयाच्या टाकीत गुदमरून दोघांचा मृत्यू; वनीतील वेकोली वसाहतीतील घटना

यवतमाळ - वणी तालुक्यातील कैलासनगर वेकोलीच्या वसाहतीतील शौचालयाचे जाम झालेले टाके साफ करण्याकरिता उतरलेल्या यनक येथील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून याला वेकोलीचे अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वृत्त

ईव्हीएमच्या रक्षणाची गरज पडल्यास हत्यारही उचलू - उपेंद्र कुशवाहा

पाटणा - ईव्हीएमचे रक्षण करण्यासाठी गरज पडल्यास प्रसंगी हत्यारही उचलू असे वक्तव्य राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी केले आहे. पाटणा येथे महागटबंधनच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वृत्त

बीडमधील १२ लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत; नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ वाटप करण्याची धनंजय मुंडेंची मागणी

बीड - शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे १२ लाख शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे. उन्हाळी मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असून पात्र विमा धारक शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त

राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील - बाळासाहेब थोरात

पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी होणार असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या पेक्षा काँग्रेसची स्थिती खूप चांगली असणार आहे. राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

सविस्तर वृत्त

ABOUT THE AUTHOR

...view details